आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sensational Win For Number One Serena In Second Round, 40 year old Serena In Third Round Of Tennis Tournament

अमेरिकन ओपन टेनिस:नंबर वन सेरेनाचा दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजय, 40 वर्षीय सेरेना टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मॅथू फायटर मॅन यजमान अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपल्या घरच्या कोर्टवर सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. तिने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत दुसऱ्या मानांकित कोंतावेतचा पराभव केला. २३ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाने ७-६, २-६, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत तिने दिमाखदारपणे प्रवेश केला. सुमार खेळीमुळे दुसऱ्या मानांकित कोंतावेतला स्पर्धेतून झटपट पॅकअप करावे लागले. आपल्या करिअरमधील शेवटची ग्रँडस्लॅम खेळत असलेल्या सेरेनाचा हा विजय दिवसभर चर्चेत राहिला. या विजयातून तिने तब्बल १३ महिन्यांनंतर सत्रातील टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आतापर्यंत तिला सलग तीन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. सेरेनाला आता तिसऱ्या फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तोमियाविकच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

तिसऱ्या मानांकित सक्कारीचा पराभव महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सक्कारीचा गुरुवारी लाजीरवाणा पराभव झाला. तिला चीनच्या बिगर मानांकित वांग जियूने पराभूत केले. चीनच्या टेनिसपटूने ३-६, ७-५, ७-५ अशा प्रकारे विजय खेचून आणला. तिसऱ्या मानांकित सक्कारीला बाहेर पडावे लागले. चीनच्या टेनिसपटूला तिसऱ्या फेरीमध्ये अमेरिकेच्या एलिसनच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

अव्वल मेदवेदेव विजयी गत चॅम्पियन डॅनियल मेदवेदेवने पुरुष एकेरीच्या गटातील आपली विजयी मोहीम कायम ठेवली. त्याने दुसऱ्या फेरीमध्ये फ्रान्सच्या ओथरचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्यापाठोपाठ इंग्लंडच्या माजी नंबर वन मरेने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे.

बातम्या आणखी आहेत...