आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:40 वर्षीय सेरेना उपांत्य फेरीत

ईस्टबर्नएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या २३ वेळच्या चॅम्पियन सेरेना विल्यम्सने दमदार पुनरागमन करताना यंदाच्या सत्रात उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. तिने आपली सहकारी आेंस जेंबूरसाेबत गुरुवारी ईस्टबर्न आेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जाेडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय संपादन केला. सेरेना-जेंबूरने लढतीत जपानच्या शुकाआेयामा आणि तैवानच्या चान हाआेचा ६५ मिनिटांत पराभव केला. त्यांनी ६-२, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली.