आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Serena Retires From Olympia For Her Daughter: Says Female Athletes Have To Retire To Raise Families, But Not Men

सेरेनाने मुलगी ऑलिम्पियासाठी घेतली निवृत्ती:म्हणाली - कुटुंब वाढवण्यासाठी महिला खेळाडूंना निवृत्ती घ्यावी लागते, पुरुषांना नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महान महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने फार विचार करूनच टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपली मुलगी ऑलिम्पियाचा उल्लेख करताना ती म्हणते, ऑलिम्पियाला माझे टेनिस खेळणे बिल्कूल आवडत नाही.

सेरेनाने जेव्हा ऑलिम्पियाला सांगितले की ती लवकरच टेनिस खेळणे बंद करत आहे, तेव्हा तिला हे ऐकूनच खूप आनंद झाला. न्यूयॉर्क शहरातील एका हॉटेलच्या लायब्ररीत सेरेनाने तिचे मन मोकळे केले आहे. खूर्चीत बसलेली सेरेना म्हणते, मुलांना हे का समजत नाही की त्यांचे आई-वडिल त्यांच्यासोबत का असत नाहीत.

टाईम मॅगझिनशी खास बोलताना सेरेना म्हणाली- 'ऑलिम्पियाला वाटते की तिलाही एक लहान बहीण असावी. त्यामुळे मी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग निवडण्यासाठी सुपरस्टार पुरुष खेळाडूंना जे करावे लागत नाही ते सर्व महिला खेळाडूला करावे लागते.

फुटबॉलपटू टॉम ब्रॅडी तीन मुलांचा बाप आहे. तो निवृत्तीनंतरही वयाच्या 44 व्या वर्षी परत येऊ शकतो. तीन मुलांचा बाप असलेला बास्केटबॉल स्टार लेब्रॉन जेम्सने वयाच्या 37 व्या वर्षी 774 कोटी रुपयांचा दोन वर्षांचा करार केला आहे.

त्याचे असे मत आहे की - 'महिलांना कुटुंब वाढवायचे असते,त्यामुळे त्यांना अनेकदा पुरुषांपेक्षा वेगळे निर्णय घ्यावे लागतात. 41 वर्षांची सेरेना म्हणते की, महिलांना आर नाही तर पार असा निर्णय घ्यावा लागतो. तरीही मी माझ्या घेतलेल्या निर्णयावर समाधानी आहे..

सेरेनाने अनेक प्रसंगी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ऑलिम्पियाच्या जन्मानंतर श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे सेरेनाचा जीव धोक्यात आला होता. तरीही यातून तिनने स्वताला बाहेर काढले आणि काही महिन्यांनंतर, सेरेनाने 2018 मध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीतही पोहचून दाखवले.

तिच्या या चिकाटी आणि कठोर मेहनतीमुळे जगभरातील लाखो मातांचे ती प्रेरणास्थान बनली. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाचा पराभव करणाऱ्या जपानची नाओमी ओसाका म्हणते- 'सेरेनाला खेळताना पाहूनच मला टेनिस खेळण्याची प्रेरणा मिळाली.'

प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या आफ्रिकन अमेरिकन स्टडीजच्या प्राध्यापक टेरा हंटर म्हणतात, "टेनिस जगाला कृष्णवर्णीय मुलींना (सेरेना आणि तिची बहीण व्हीनस) त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट शैलीमध्ये पाहण्याची सवय नव्हती. विल्यम्स बहिनींनी नवी सुरुवात केली आहे.

केवळ महिलांनाच नव्हे तर तरुण कार रेसर लुई हॅमिल्टनलाही सेरेना, व्हीनसपासून प्रेरणा मिळाली आहे. ती माझ्यासाठी एक मोठी प्रेरणास्थान आहे, असे हॅमिल्टन म्हणतो. माझ्या खेळामध्ये मी एकमेव कृष्णवर्णीय होतो. त्यामुळे या दोन्ही कृष्णवर्णीय बहिणींना पाहून माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

2 महिन्यांच्या गरोदरपणामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन खेळली, त्यात एकही सेट गमावला नाही

2017 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी सेरेनाला ती गर्भवती असल्याचे समजले. तिचे पती, व्हेंचर कॅपिटल इन्वेस्टर आणि Reddit चे सह-संस्थापक, एलेक्स ओहानियन, डॉक्टरांनी सांगीतले होते की, तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. त्यावर रेलेनाने सांगीतले मी स्वताला सांभाळेन.

सेरेनाने आपल्या पतीला सांगितले की तिने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही, कारण तिला माहित होते की सामना लवकर संपवला तर ते आपल्या बाळासाठी अधिक चांगले होईल. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी अमेरिकन एथलीट एलिसन फेलिक्सने सेरेनाला पाहूनच प्रशिक्षण आणि स्पर्धामध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला..

लोकांना वाटते की ते कृष्णवर्णीय आहेत म्हणून सुंदर नाहीत, पण मला मात्र असं वाटत नाही

सेरेनाने वर्णभेद आणि अन्यायाविरोधात उघडपणे आवाज उठवला आहे. तिने कृष्णवर्णीयांच्या समानता आणि न्यायासाठी लढणाऱ्या इक्वल जस्टिस इनिशिएटिव संघटनेतून पैसे उभे केले. ब्लॅक लाइव्ह्स मॅटर आंदोलनाच्या प्रमुख एलिसिया गार्झा म्हणतात, "सेरेनावर होणाऱ्या टीका आणि एटॅक सहन करते आणि तितक्याच कठोरपणाने त्या सगळ्यांना प्रत्युत्तरही देते."

विल्यम्स बहिणींनी टेनिस खेळण्याची पद्धत बदलली आहे. वर्णभेदाच्या टीकाकारांची तोंड बंद करत सेरेनाने सौंदर्याची परिभाषाही बदलली आहे. सेरेना म्हणते, अनेकांना वाटते की ते सावळे किंवा कृष्णवर्णीय रंगाचे असल्याने ते सुंदर नाहीत. पण मला असं कधीच वाटलं नाही.

सेरेनाने स्त्री शरीराच्या इमेजबद्दलची परिभाषाच बदलली

सेरेनाने वयाच्या 30 व्या वर्षी 23 पैकी दहा जेतेपदे जिंकली आहेत. बहुतेक खेळाडू या वयात निवृत्त होतात किंवा त्यांची रॅंकिंग खाली येते. सेरेनाने महिला खेळाडूंच्या वागणुकीबाबत लोकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. प्रत्येक कार्यक्षेत्रात तिने शक्ती, जिद्द आणि तळमळ दाखवून महिलांसाठी एक नवीन स्थान निर्माण केले आहे.

स्त्री शरीराची प्रतिमा तिने नव्याने साकारली आहे. जेव्हा तज्ज्ञ आणि वर्णद्वेषींनी तिची पुरुषाच्या शरीराशी तुलना करत तिच्या शारीरिक स्वरूपाची खिल्ली उडवली तेव्हा त्या लोकांच्या नाकावर टिच्चून तिने सातत्याने फोटोशूट करून त्यांची तोंडं बंद केली

बातम्या आणखी आहेत...