आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Serena Returns Six Months Later, Winning The First Match; The Sound Of Traffic Instead Of The Audience, Said A New Experience

अव्वल मानांकित ओपन:सेरेनाचे सहा महिन्यांनंतर पुनरागमन, पहिला सामना जिंकला; प्रेक्षकांऐवजी वाहतुकीचा आवाज, म्हणाली- नवा अनुभव आला

ख्रिस्तोफर क्लेरी | लेक्सिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेरेना व व्हीनस यांच्यात 31 वी लढत, सेरेनाचे 18 विजय

कोरोनानंतर सेरेना विल्यम्स कोर्टवर परतली आहे. सहा महिन्यांनंतर पहिला सामना खेळत असलेली सेरेना पहिल्या सेटमध्ये अमेरिकन बेर्नार्डा पेराकडून पराभूत झाली. एकवेळ दुसऱ्या सेटमध्ये पेरा ४-४ व ०-४० ने पुढे होती. त्यानंतर ती सामना जिंकू शकली नाही. प्रेक्षकांविना सुरू असलेल्या अव्वल मानांकित ओपनमध्ये सर्व नवीन होते. सेरेनासाठी पूर्णपणे नवा अनुभव होता. दुसरा सेट ६-४ ने जिंकल्यानंतर सेरेनाने तिसरा सेट ६-१ ने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

कोर्टवर प्रेक्षकांच्या गोंधळाऐवजी वाहतुकीचा आवाज होता. सामन्यानंतर २३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेतीने म्हटले, “वातावरण खूप शांत होते. मला ते अावडले नाही असे म्हणणार नाही. मी करिअरमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या. मात्र, सध्याचा एकदम वेगळा अनुभव आला.’ तिने म्हटले की, मला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे आणि मी करू शकते हे मला माहिती आहे. सामना जिंकल्यानंतर सेरेनाने रॅकेट उंचावून पेराचे कौतुक केले. कोरोनाच्या भीतीमुळे खेळाडूंना सामन्यानंतर हात मिळवणे व गळाभेट घेण्यास परवानगी नाही. बॉल बॉय व गर्ल्सदेखील खेळाडूंना टॉवेल देत नव्हते. त्याला बेसलाइनजवळ लटकावले होते. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सेरेनाचा सामना मोठी बहीण व्हीनसशी होईल. पहिल्या फेरीत सात वेळची एकेरीची ग्रँडस्लॅम विजेता व्हीनसने माजी नंबर वन बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाला ६-३ व ६-२ ने हरवले.

३१ व्या वेळी सेरेना-व्हीनस लढत

एकेरीत सेरेना व व्हीनस यांच्यात ३० सामने झाले. पहिला सामना १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळवला गेला होता, ज्यात व्हीनसने ७-६, ६-१ ने विजय मिळवला. पहिले तीन सामने व्हीनसने जिंकले, मात्र त्यानंतर सेरेनाचा दबदबा सुरू झाला. आतापर्यंत तिने १८ सामने जिंकले आणि १२ मध्ये पराभव झाला. ९ वेळा दोन्ही बहिणी ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये भिडल्या. यात सेरेना ८-१ ने पुढे होती.

२०१७ मध्ये सेरेनाने व्हीनसला अखेरच्या ग्रँडस्लॅमध्ये मात दिली

सेरेना विल्यम्सने २०१७ ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये बहीण व्हीनसला हरवत आपला २३ वा आणि एकेरीतील अखेरचा ग्रँडस्लॅम किताब जिंकला होता. त्यानंतर तिला २४ व्या किताबाची प्रतीक्षा आहे. ३१ ऑगस्ट रोजी यूएस ओपनला सुरुवात होत आहे. सामन्यादरम्यान सेरेनाचा फिटनेस दिसला. तिने स्वत:ला सिद्ध केले.

बातम्या आणखी आहेत...