आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस ओपन:अझारेंकाने 6 वेळची चॅम्पियन सेरेनाला पहिल्यांदा हरवले; फायनलमध्ये नाओमी आेसाकाशी सामना

न्यूयॉर्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अझारेंका 7 वर्षांनी आणि ओसाका दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल

यूएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये दोन माजी नंबर वन खेळाडू भिडतील. बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने सहा वेळेची माजी चॅम्पियन सेरेना विल्यम्सला १-६, ६-३, ६-३ ने मात दिली. दुसरीकडे, जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या जेनिफर ब्राडीला ७-६, ३-६, ६-३ ने हरवले. अझारेंका ७ वर्षांनी ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचली, तर ओसाका दुसऱ्यांदा यूएस ओपनच्या फायनलमध्ये खेळेल. अझारेंका व ओसाका सलग दुसऱ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये समोरासमोर असतील. यूएस ओपनपूर्वी वेस्टर्न अँड सदर्न ओपन स्पर्धेची फायनल या दोघींत झाली. तेव्हा स्नायू दुखावल्याने ओसाकाने सामन्यातून माघार घेतली आणि अझारेंकाने किताब जिंकला. तो अझारेंकाचा करिअरमधील २१ वा किताब होता.

नाओमी व्हिक्टोरिया
ओसाकाचा यंदाचा सलग दहावा विजय : चौथ्या मानांकित ओसाकाचा चालू वर्षात सलग दहावा विजय ठरला. तिने जेनिफरला ३ सेटमध्ये नमवले. हा जेनिफरचा पहिला ग्रँडस्लॅमचा उपांत्य सामना होता. ओसाका यापूर्वी २०१८ मध्ये चॅम्पियन बनली होती. त्या वेळी ती केवळ २० वर्षांची होती.

ओसाका अझारेंका
अझारेंकाने १० सामने गमावल्यावर सेरेनाला हरवले : बिगरमानांकित अझारेंकाने ग्रँडस्लॅममध्ये सेरेनाला पहिल्यांदाच हरवले. यापूर्वी ग्रँडस्लॅममध्ये सेरेनाविरुद्ध १० सामने गमावले. तिचा हा सलग ११ वा विजय ठरला. दोघींत आतापर्यंत २३ सामने झाले. यात सेरेनाने १८ व अझारेंकाने ५ सामने जिंकले.

बातम्या आणखी आहेत...