आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा:सेरेना विजयी; सिमाेना हालेप, सितसिपास सलामीलाच पराभूत

मॅथ्यू फटरमॅन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सेरेनाने यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. तिने आपल्या घरच्या काेर्टवर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत माेेंटेनेग्राेच्या काेविनिचला धूळ चारली. दुसरीकडे राेमानियाच्या सातव्या मानांकित सिमाेना हालेप आणि किताबाच्या दावेदार सितसिपासला सलामीलाच लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून झटपट पॅकअप करावे लागले. अमेरिकेच्या ४० वर्षीय सेरेनाने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या टेनिसपटूला ६-३, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. या एकतर्फी विजयासाठी तिला एक तास ४० मिनिटे शर्थीची झंुज द्यावी लागली. आता सेरेनासमाेर दुसऱ्या फेरीत अॅस्टाेनियाच्या दुसऱ्या मानांकित काेंटावेटच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. अमेरिकन टेनिसपटू सेरेनाची ही शेवटची स्पर्धा आहे. ती टेनिसच्या ओपन एरामध्ये सर्वाधिक २३ ग्रँडस्लॅम जिंकणारी एकमेव महिला टेनिसपटू आहे. अव्वल मानांकित मेदवेदेवने पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. त्याने सलामीला यजमान अमेरिकेच्या स्टीफन काेजलाेवचा पराभव केला. त्याने ६-२, ६-४, ६-० ने सामना जिंकला.

युक्रेनच्या डेरियाचा सनसनाटी विजय : रशियाच्या हल्ल्यातून सावरलेल्या युक्रेनच्या टेनिसपटू डेरिया स्निगुरने महिला एकेरीच्या सलामीला सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने १०० मिनिटांत सातव्या मानांकित सिमाेना हालेपचा ६-२, ०-६, ६-४ ने पराभव केला. तिचा सामना कॅनडाच्या रेबिकाशी हाेणार आहे.

सितसिपासची झंुज अपयशी : चाैथ्या मानांकित सितसिपासला पराभवाला सामाेरे जावे लागले. त्याने विजयासाठी दिलेली २ तास ४८ मिनिटांची झंुज अपयशी ठरली. त्याला काेलंबियाच्या बिगरमानांकित डॅनियल इलाहीने पराभूत केले. डॅनियलने ६-०, ६-१, ३-६, ७-५ ने राेमहर्षक विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...