आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shakib Dysyanda Player Of The Month, Women’s Gatat Ishimwe Award Winner

पुरस्कार:शाकिब दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द मंथ, महिला गटात इशिमवे पुरस्कार विजेता

दुबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि रवांडाची युवा अष्टपैलू खेळाडू हेन्रिएट इशिमवे यांना मार्च महिन्याचा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाला. शाकिबने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी जुलै २०२१ मध्येही शाकिबने हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराच्या शर्यतीत शाकिबने न्यूझीलंडचा केन विल्यमसन व यूएईचा आसिफ खान यांना मागे टाकले. बांगलादेशला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिन्ही सामन्यांत त्याने बळी घेतले. त्याचबरोबर १९ वर्षीय इशिमवेने गेल्या महिन्यात नायजेरियन महिला टी-२० स्पर्धेत ९२ धावा केल्या आणि ९ गडी बाद केले. तिने हॅट‌्ट्रिकही घेतली. हा पुरस्कार जिंकणारी ती असोसिएट सदस्य देशाची दुसरी महिला खेळाडू आहे.