आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shardul Thakoor Birthday । Csk Win । Chennai Super Kings Win, Team Celebrates Shardul's Unique Birthday

चेन्नई सुपर किंग्सचे डबल सेलिब्रेशन:असा झाला शार्दूल ठाकूरचा बर्थडे आणि फायनलच्या विजयाचा जल्लोष; धोनीने शार्दूलला चक्क केकनेच घातली आंघोळ

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला 27 धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. त्यात शार्दुल ठाकूर याचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरच्या वाढदिवशी CSK च्या विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे. शार्दुल याचा जन्म 16 ऑक्टोंबर 1991 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झाला. विजेतेपद आपल्या नावावर केल्यानंतर CSK टीम जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा शार्दुलचा जन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शार्दुलच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य सहकारी टाळ्या वाजवत, शार्दुलला केक कापण्यासाठी सांगत आहे. तसेच काही सहकारी शार्दुलच्या अंगावर कोल्ड ड्रिंग्स टाकतांना पाहायला मिळत आहे. तर काही खेळाडू गाना गातांना आणि नाचतांना देखील दिसत आहे.

शार्दुलची दमदार कामगिरी
IPL2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी टॉस हरला होता. त्यात सुरुवातीला फलंदाजी करत चेन्नईने 193 धावा काढल्या होत्या. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने लक्ष्याचा पाठलाग सुरू केला. व्यकंटेश अय्यर आणि शुभमन गिल यांना पावर प्ले दरम्यान 55 धावा केल्या. त्यावेळी असे वाटत होते की, हा सामना चेन्नईच्या हातातून निघून गेला आणि चेन्नईचे पराभव 100 टक्के होणार आहे. मात्र 11 व्या ओव्हरमध्ये शार्दुलने दमदार कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात कोलकाताला 27 धावांचा पराभव स्वीकारावा लागला.

बातम्या आणखी आहेत...