आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shardul's Fastest Half century, Varun's 4 Wickets; Kolkata Win, Hosts Kolkata Beat Bengaluru By 81 Runs

आयपीएल 2023:शार्दूलचे वेगवान अर्धशतक, वरुणचे 4 बळी; काेलकाता संघाची बंगळुरूवर 81 धावांनी मात

दिव्य मराठी नेटवर्क | काेलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शार्दूल (६८ धावा, १ बळी) सामनावीरचा मानकरी

सामनावीर शार्दूल ठाकूरने (६८ धावा, १ बळी) गुरुवारी काेलकात्याच्या एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर यंदाच्या अायपीएलमध्ये विक्रमाला गवसणी घातली. त्याने अष्टपैलू कामगिरीतून काेलकाता संघाला शानदार विजय मिळवून दिला. काेलकाता संघाने सामन्यात डुप्लेसिसच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमवर मात केली. काेलकाता संघाने १७.४ षटकांत ८१ धावांनी सामना जिंकला. यासह काेलकाता संघाने लीगमध्ये पहिल्या विजयाची नाेंद केली. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. वरुणने ४ आणि सुयश शर्माने ३ बळी घेत काेलकात्याच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

यजमान काेलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या माेबदल्यात २०४ धावा काढल्या अाहेत. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला १७.४ षटकांत अवघ्या १२३ धावांवर अापला गाशा गुंडाळावा लागला. यातून टीमचा पहिला पराभव झाला.
शार्दूलचे सत्रात दुसरे वेगवान अर्धशतक : शार्दूल ठाकूरने २० चेंडूंमध्ये ६ चाैकार अाणि ३ उंत्तुग षटकारातून अर्धशतक केले. यासह त्याने यंदाच्या सत्रामध्ये सर्वात वेगवान दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. यातून त्याने राजस्थानच्या बटलरशी बराेबरी साधली. बटलरने गत सामन्यात हैदराबादविरुद्ध हा पराक्रम गाजवला हाेता.

शार्दूल-रिंकूची शतकी भागीदारी
शार्दूल ठाकूरने झंझावाती खेळी करताना २० चेंडूंत अर्धशतक साजरे केले. त्याने २९ चेंडूंमध्ये ९ चाैकार अाणि ३ षटाकरांसह ६८ धावांची माेठी खेळी केली. यादरम्यान त्याने रिंकू सिंगसाेबत ४७ चेंडंूंमध्ये १०३ धावांची भागीदारी रचली.