आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-२० विश्वचषकातील अपयशातून सावरलेला भारतीय संघ आता घरच्या मैदानावर हाेणाऱ्या वनडे वर्ल्डकपची तयारी करत आहे. टीम इंडियाने हा विश्वचषक आपल्या नावे करण्याच्या माेहिमेला सुरुवात केली. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शाॅर्टलिस्ट २० खेळाडू निश्चित केले आहेत. या खेळाडूंना आता आगामी ऑक्टाेबरपर्यंत हाेणाऱ्या ३५ वनडे सामन्यांतून क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. यातूनच या सामन्यादरम्यान या सर्व खेळाडूंची परीक्षाच आहे. सर्वाेत्तम कामगिरीतून त्यांना विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रवेश निश्चित करता येणार आहे. कामगिरीवर निवड समितीची बारीक नजर असणार आहे. यादरम्यान धवन व अश्विन यांना वगळण्यात आले आहे.
1. रोहित शर्मा: बीसीसीआयचा नेतृत्वासाठी विश्वास आहे. त्याच्या नावे २३५ वनडेत ८९.४२ च्या स्ट्राइक रेटने ९४५४ धावा.
2. विराट कोहली: वनडेत सर्वाधिक धावांची नाेंद असणारा दुसरा क्रिकेटपटू आहे. ताे सर्वच फाॅरमॅटमध्ये सर्वाेत्तम खेळी करताे
3. ईशान किशन: बांगलादेश संघाविरुद्ध द्विशतकी खेळीतून त्याने आपली क्षमता सिद्ध केली. राेहितसाेबत सलामीवीराच्या भूमिकेसाठी प्रबळ दावेदार आहे.
4. श्रेयस अय्यर: २०२२ मध्ये ओव्हरऑल टाॅप स्काेअरर श्रेयसची तिन्ही फाॅरमॅटमधील ३९ सामन्यांत १ शतक व १४ अर्धशतके नाेंद आहेत.
5. शुभमान गिल: कसाेटीत सर्वाेत्तम खेळी करणारा गुणवंत सलामीवीर म्हणून ठसा उमटवत आहे. याच उल्लेखनीय खेळीतून त्याने धवनलाही मागे टाकले.
5. शुभमान गिल: कसाेटीत सर्वाेत्तम खेळी करणारा गुणवंत सलामीवीर म्हणून ठसा उमटवत आहे. याच उल्लेखनीय खेळीतून त्याने धवनलाही मागे टाकले.
7. ऋषभ पंत: सर्व फाॅरमॅटमध्ये भारतातील सर्वाेत्तम खेळाडूंपैकी एक अशी ऋषभची ओळख आहे. ताे सध्या कारच्या भीषण अपघातामुळे दुखापतग्रस्त आहे.
8. हार्दिक: दुखापतीनंतरही हार्दिकचे पुनरागमन करताना घवघवीत यश. फलंदाजीसह त्याची गाेलंदाजीतील कामगिरीही लक्षवेधी ठरली.
9. रवींद्र जडेजा: दुखापतीने सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या जडेजाची अष्टपैलू खेळी काैतुकास्पद आहे. त्याने मॅचविनरची भूमिका बजावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.