आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर सध्या क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, त्याचे पुनरागमन आता अशक्य मानले जात आहे. गंभीर दुखापतीमुळे त्याला अद्याप तरी कमबॅक करता येणार नाही. यातून ताे यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी हाेऊ शकणार नाही. यामुळे काेलकाता नाइट रायडर्स संघाला आता नितीश राणाकडेच कर्णधारपद कायम ठेवावे लागणार आहे. याच दुखापतीमुळे श्रेयस हा जुलै महिन्यात हाेणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला मुकणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान गत उपविजेता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही फायनल रंगणार आहे. दुसरीकडे बंगळुरू संघालाही माेठा धक्का बसला आहे. टीमचा युवा सलामीवीर रजत पाटीदार जायबंदी झाला. यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.