आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने वनडेत लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे त्याला आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधता आली. त्याने चाैथ्या स्थानावर धडक मारली. त्याच्या नावे ७३८ रेटिंग गुणांची नाेंद झाली. यासह ताे भारताचा क्रमवारीत सर्वाेत्तम स्थान गाठणारा युवा फलंदाज ठरला. त्याने करिअरमध्ये पहिल्यांदाच चाैथे स्थान गाठले आहे. त्याने यंदा ९ वनडे सामन्यात ६२४ धावांची खेळी केली. यासह त्याला क्रमवारीत माेठी प्रगती साधता आली. कर्णधार राेहित शर्मा टाॅप-१० मध्ये भारताचा तिसरा खेळाडू आहे. तसेच माजी कर्णधार विराट काेहलीला क्रमवारीमध्ये एका स्थानाचा फायदा झाला. त्याने सहावे स्थान गाठले आहे. तसेच गाेलंदाजीमध्ये भारताचा माे. सिराज एकमेव टाॅप-१० मध्ये आहे. तसेच सूर्यकुमार यादवने टी-२० फाॅरमॅटच्या क्रमवारीतील आपले जगातील नंबर वनचे स्थान कायम ठेवले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.