आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई विक्रम मोडला:भारताला जागतिक कनिष्ठ अँथलेटिक्समध्ये रौप्यपदक

कॅरी (काेलंबिया)16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक २० वर्षांखालील कनिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मिश्र ४ x ४०० मीटर रिलेमध्ये भारताने रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत संघाचे हे सलग दुसरे पदक ठरले. यापूर्वी २०२१ मध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते. या संघात बराथ श्रीधर, प्रिया मोहन, सुमी कपिल आणि अब्दुल रझाक या युवा खेळाडूंचा समावेश आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने ३ मिनिटे १७.७६ सेकंदात आशियाई विक्रमासह दुसरे स्थान पटकावले. भारतीय संघाने एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी बनवलेला स्वतःचाच आशियाई विक्रम मोडला. भारतीय संघाने शर्यतीच्या तिसऱ्या हीटमध्ये ३ मिनिटे १९.६२ सेकंद वेळ नोंदवली होती. शर्यतीत अमेरिकेने ३ मिनिट १७.६९ सेकंदात सुवर्णपदक आपल्या नावे केले. जमैकाच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...