आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Silver Medal To Malavika; Double Bang Of Medals For Palak, Gairav, Three Medals For Maharashtra Team In Archery

नॅशनल गेम्स:मालविकाला राैप्यपदक; पलक, गाैरवचा पदकांचा डबल धमाका,  महाराष्ट्र संघाला तिरंदाजीत तीन पदके

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑरेंज सिटीची आंतरराष्ट्रीय युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसाेड गुरुवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत राैप्यपदकाची मानकरी ठरली. नागपूरच्या या बॅडमिंटनपटूला महिला एकेरीच्या फायनलमध्ये आकर्षी कश्यपविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तसेच महाराष्ट्राच्या फाॅर्मात असलेल्या जलतरणपटू पलक जाेशी आणि तिरंदाज गाैरव लांबेने स्पर्धेत पदकांचा डबल धमाका उडवला. गाैरवने सहा तासांत महाराष्ट्रासाठी दाेन पदके जिंकली. महाराष्ट्राची उर्वशी जाेशी स्क्वाॅशमध्ये राैप्यपदक विजेती ठरली. डायव्हिंगमध्ये अनुज शहाने कांस्यपदकाची कमाई केली. यासह महाराष्ट्र संघाला पदक जिंकण्याची लय कायम ठेवता आली. राजकोट येथे जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या पलक जोशीने महिलांच्या १०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत तिसरे स्थान गाठले. तिने हे अंतर एक मिनिट ०७.१८ सेकंदांत पार केले. याआधी या स्पर्धेतील २०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत तिने कांस्यपदक पटकावले होते.‌ महाराष्ट्राच्या अनुज शहा याने पुरुषांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याने सूर मारताना अप्रतिम कौशल्य आणि लवचिकता दाखवली. त्याने आजपर्यंत कनिष्ठ व वरिष्ठ गटातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत.

तिरंदाजी : गौरवची सहा तासांत दाेन पदके महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडू गौरव लांबेने स्पर्धेमध्ये पदकांचा डबल धमाका उडवला. त्याने अवघ्या सहा तासांच्या फरकाने महाराष्ट्र संघाला दुसरे पदक जिंकून दिले. गौरव लांबेने आपली सहकारी चारुलतासोबत मिक्स रिकर्व्ह गटात रौप्यपदक जिंकले. गौरवने सकाळच्या सत्रात सांघिक रिकर्व्ह गटात कांस्यपदकावर नाव कोरले. नाशिकच्या युवा तिरंदाज कुणाल पवारने अटीतटीच्या लढतीत अचूक पद्धतीने एक्स मारून महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. यासह महाराष्ट्र पुरुष संघ रिकर्व्ह गटात कांस्यपदक विजेता ठरला.

स्क्वॉश : उर्वशी जोशीला रौप्य महाराष्ट्राच्या उर्वशी जोशीने स्क्वाॅशमध्ये रौप्यपदक जिंकले. तसेच राहुल बैठा हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला. उर्वशीला अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या सुनयना कुरुविलाकडून ११-७, ११-८, ७-११, ६-११, ४-११ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे उर्वशी जोशीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या राहुल बैठाने कांस्यपदक संपादन केले. तामिळनाडूच्या अभय सिंग याने राहुलला ७-११, ११-८, ११-६, ११-९ असे ३-१ ने पराभूत केले.

याेगासन : छकुलीने गाठली फायनल महाराष्ट्राची युवा याेगापटू छकुली सेलाेकर आणि पुर्वा किनरे पारंपारिक याेगासन गटाची फायनल गाठली. नागपूरच्या राष्ट्रीय खेळाडू छकुलीने उपांत्य फेरीत ६०.०५ गुणांची कमाई करत फायनल गाठली. यादरम्यान ती टाॅप- १० मध्ये दुसऱ्या स्थानी राहिली.

बातम्या आणखी आहेत...