आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Simona Halep In The Semifinals; Overcome Coco Graf In 77 Minutes, Murray's Winning Opener

माद्रिद ओपन टेनिस:सिमोना हालेप उपांत्यपूर्व फेरीत; कोको ग्रॉफवर 77 मिनिटांत मात, मरेची विजयी सलामी

माद्रिद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वेळच्या किताब विजेत्या सिमोना हालेपने आता तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा आपला दावा मजबूत केला. तिने मंगळवारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. तिने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये अमेरिकन युवा टेनिसपटू कोको ग्रॉफला ६-४, ६-४ ने पराभूत केले. यासाठी तिला एक तास १७ मिनिटांपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. आता हालेपचा अंतिम आठमधील सामना आठव्या मानांकित ओंस जेंबुरशी होईल. ट्युनिशियाच्या जेंबूरने तिसऱ्या फेरीमध्ये स्विसच्या ११ व्या मानांकित बेलिंडा बेनकिचवर ६-२, ३-६, ६-२ ने मात केली. या मॅरेथाॅन लढतीत विजयासाठी तिला तब्बल एक तास ५८ मिनिटांपर्यंत झंुज द्यावी लागली.

इंग्लंडच्या अँडी मरेने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत २०२० यूएस चॅम्पियन डाेमिनिक थिएमवर मात केली. त्याने ६-३, ६-४ ने विजय संपादन केला.

इंग्लंडच्या कॅमरून नॉरीने विजयी सलामी दिली. त्याने दक्षिण कोरियाच्या क्वोन सूनचा ७-५, ७-५ ने पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...