आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:सिमाेना हालेपने पटकावली टाेरंटाे मास्टर्स ट्राॅफी

टाेरंटाे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन सिमाेना हालेपने यंदाच्या टाेरंटाे मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने फायनलमध्ये ब्राझीलच्या बीट्रिजला धूळ चारली. तिने २ तास १६ मिनिटे शर्थीची झंुज देत ६-३, २-६, ६-३ अशा फरकाने अंतिम सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह तिला आपल्या नावे या स्पर्धेत तिसऱ्या विजेेतेपदाची नाेंद करता आली. राेमानियाच्या या ३० वर्षीय टेनिसपटूने यापूर्वी २०१६ आणि २०१८ मध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला हाेता.

या किताबासाठी आता १५ व्या मानांकित हालेपला तीन सेटपर्यंत माेठी झुंज द्यावी लागली. पहिल्यांदाच फायनल गाठणाऱ्या ब्राझीलच्या टेनिसपटूनेही विजयासाठी शर्थीची झंुज दिली.

अझारेंकाची विजयी सलामी : व्हिक्टाेरिया अझारेंकाने सिनसिनाटी आेपन टेनिस स्पर्धेतील किताबाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात एस्टाेनियाच्या कानेपीचा तीन सेटमध्ये पराभव केला. तिने ६-३, ४-६, ६-३ ने सलामी सामना जिंकला. यासह तिला दुसरी फेरी गाठता आली. तसेच पाेलंडच्या इगा स्वातेक, दुसऱ्या माानंकित काेंटावेट आणि स्पेनच्या बासाेडाला सलामीला पुढे चाल मिळाली.

बातम्या आणखी आहेत...