आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sindhu, The Second Indian Woman To Win The Swiss Open Title | Marathi News

बॅडमिंटन:स्विस ओपन किताब जिंकणारी सिंधू दुसरी भारतीय महिला, प्रणय ठरला उपविजेता

बासेल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डबल ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू रविवारी स्विसओपन बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने महिला एकेरीचा किताब आपल्या नावे केला. दरम्यान, एचएच प्रणयला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याचा पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये पराभव झाला. सिंधूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये थायलंडच्या बुसाननला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. दुसऱ्या मानांकित सिंधूने ४९ मिनिटांत २१-१६, २१-८ ने एकतर्फी विजय संपादन केला. यासह ती या स्पर्धेत चॅम्पियनचा बहुमान पटकवणारी दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. यापूर्वी माजी नंबर वन सायना नेहवालने (२०११, २०१२) मध्ये या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला हाेता. सिंधूने आपल्या करिअरमध्ये बुसाननचा सलग सहाव्यांदा आणिओव्हरऑल १६ व्यांदा पराभव केला.

चाैथ्या मानांकित जाेनाथन क्रिस्टीने फायनलमध्ये भारताच्या प्रणयला ४८ मिनिटांत २१-१२, २१-१८ ने धूळ चारली. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. यातूनच प्रणयचा इंडाेनेशियाच्या क्रिस्टीविरुद्धचा हा पाचवा पराभव ठरला.

बातम्या आणखी आहेत...