आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sindhu Warns Of Action Against Those Who Spread Rumors; No Dispute With The Family coach, To London For Recovery

क्रीडा:‘ती’ अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा सिंधूचा इशारा; कुटुंब-कोच यांच्याशी वाद नाही, रिकव्हरसाठी लंडनला

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधू कौटुंबिक वादामुळे कॅम्प सोडून गेल्याची चर्चा

बॅडमिंटनची जागतिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने मंगळवारी म्हटले की, न्यूट्रिशनल व रिकव्हरीवर काम करण्यासाठी लंडनला आली आहे. कुटुंब व प्रशिक्षकासोबत तिचा कोणताच वाद नाही. माध्यमांनी दावा केला होता की, सिंधू कौटुंबिक वादामुळे लंडनला निघून गेली आहे. तिच्या वडिलांनी दावा केला होता की, सिंधू हैदराबादमधील राष्ट्रीय शिबिरामुळे नाराज होती. सिंधू दहा दिवसांपूर्वीच लंडनला निघून गेली. “मी रिकव्हरीसाठी लंडनला आले आहे. मी गेटोरेड स्पोर्ट््स सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये सराव करतेय. घरच्यांनादेखील त्याची माहिती आहे. त्यांनी माझे करिअर बनवण्यासाठी खूप त्याग केला. आमचे दररोज बोलणे असते. प्रशिक्षक गोपीचंद यांच्याशीदेखील वाद नाही, असे सांगून तिने चर्चेवर पडदा टाकला.

काेच नीट लक्ष देत नसल्याने सिंधू नाराज असल्याचा वडिलांचा आराेप

सिंधूचे वडील रमण्णा म्हणाले की, “सिंधू हैदराबादमधील शिबिरामुळे नाराज आहे. तिचा सराव योग्य पद्धतीने होत नाही. २०१८ एशियन गेम्सनंतर मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद तिच्या प्रशिक्षणावर योग्य लक्ष देत नाहीत. तिला सरावासाठी योग्य सहकारीदेखील देण्यात आला नाही.’ गोपीचंद यांनी रमण्णांच्या प्रतिक्रियेवर बोलण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले, सिंधूने काही म्हटले असते तर मी त्यावर उत्तर दिले असते. सध्या सिंधुच्या या वादाची जाेरदार चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...