आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Six Youths From Maharashtra Including Rudransh, Shukamani In Mission Cell; Olympic Opportunities Under Sai's Guidance

मंडे पॉझिटिव्ह:मिशन सेलमध्ये रुद्रांश, शुकमणीसह महाराष्ट्राचे सहा युवा; साईच्या मार्गदर्शनात ऑलिम्पिकची संधी

एकनाथ पाठक | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिशन ऑलिम्पिक सेल; 2024, 2028 ऑलिम्पिक पात्रतेसाठीची खास तयारी
  • साईकडून 12 खेळ प्रकारातील एकूण 258 युवा खेळाडूंची निवड

आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमधील भारताच्या सदस्यीय संघामध्ये वाढ हाेण्यासाठी आता साईच्या वतीने देशभरात एक वेगळी माेहीम राबवण्यात येत आहे. मिशन ऑलिम्पिक सेल (एमआेसी) नावाची माेहीम आता साईने हाती घेतली. यासाठी देशभरातील गुणवंत २५८ युवा खेळाडूंची निवड करण्यात आली. २०२४ व २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी ही माेहीम महत्त्वाची मानली जाते. यासाठी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय सहा युवा खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांश पाटील, साहू मानेसह अमरावतीचा आंतरराष्ट्रीय तिरंदाज शुकमनी बाबरेकर, मयूर राेकडे, साक्षी शिताेळे, धावपटू कावेरी पाटीलचा समावेश आहे. या सर्वांना ऑलिम्पिक पात्रतेच्या तयारीसाठी साई मदत करणार आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना खास साेयी-सुविधा; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीचा सर्व खर्च साई करणार

आगामी २०२४ आणि २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आता साईच्या वतीने खास माेहीम हाती घेण्यात आली. यासाठी आता साईच्या वतीने मिशन ऑलिम्पिक सेलची घाेषणा करण्यात आली. याच्या माध्यमातून आता या १२ खेळ प्रकारातील २५८ युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये महिन्याकाठी २५ हजारांच्या आउट ऑफ पॅकेटसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या टूरसाठीच्या सर्व खर्चांचा समावेश आहे. याशिवाय या सर्व खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय काेच, फिजियाे आणि प्रशिक्षणाबाबतचा सर्व खर्च साईच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगिरीचा दर्जा उंचावण्याच्या इराद्याने ही माेहीम देशभरात राबवली जाणार आहे. यातून ऑलिम्पियन खेळाडू घडवण्याचा साईचा मानस आहे.

रुद्रांश सीनियर संघात सहभागी; ऑलिम्पिक पात्रतेसाठी उंचावताेय कामगिरीचा दर्जा!

ठाण्याचा युवा आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांश पाटील आता आगामी ऑलिम्पिक पात्रतेचे टार्गेट गाठण्याच्या इराद्याने प्रचंड मेहनत घेत आहे. ठाण्यातील रेंजवर त्याचा नित्याचा सराव सुरू आहे. खेेलाे इंडिया युथ गेम्स आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील साेनेरी यशाने त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. यातील लय कायम ठेवताना त्याने दर्जेदार कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या या १६ वर्षीय युवा नेमबाजाला भारताच्या वरिष्ठ संघामधील आपले स्थान निश्चित करता आले. त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील १० मीटर रायफल प्रकारातील कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे.

टाॅॅपमध्ये तेजस्विनी सावंत, अविनाश साबळे; ऑलिम्पियन राही सरनाेबतचे स्थान कायम

क्रीडा मंत्रालच्या वतीने ऑलिम्पिक पात्र खेळाडंूसाठी सर्व सुविधा पुरवल्या जातात. यासाठी खास टार्गेट पाेडियम ऑलिम्पिक (टाॅप) ही माेहीम राबवली जाते. याच्या माध्यमातून पात्र खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येतात. यासाठीही आता केंद्राच्या वतीने एकूण ९४ खेळाडूंच्या नावाची घाेषणा करण्यात आली. यामध्ये नव्यानेच ऑलिम्पिक पात्र तेजस्विनी सावंत व धावपटू अविनाश साबळेची निवड करण्यात आली. हे दाेघेही पुढच्या वर्षी टाेकिआे ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. राही सरनाेबतचा दुसऱ्यांदा टाॅपमध्ये समावेश करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...