आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण:स्मिता काटवे, विष्णू लोखंडे, डॉ. एस. सरोसिया चमकले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला (हरियाणा) येथे नुकत्याच झालेल्या १८ व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत औरंगाबादच्या स्मिता काटवे यांनी १०० मी. बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण व २०० मी. वैयक्तिक मिडले प्रकारात रौप्यपदक पटकावले. विष्णू लोखंडे यांनी ५० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य, १०० मी. बॅकस्ट्रोक व ४ बाय ५० मीटर रिले प्रकारात कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे, डॉ. एस. सरोसिया यांनी ५० मी. फ्री स्टाइलमध्ये कांस्यपदक मिळवले. विजेत्या खेळाडूंचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, जलतरण संघटनेचे अध्यक्ष रुस्तुम तुपे, आरोग्य अधिकारी पारस मंडलेजा, रवींद्र राठी, अशोक काळे, संदीप चव्हाण, सुशील बंग, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अभय देशमुख, राजेंद्र काळे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...