आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Smriti Mandhana Bumrah Deepak Chahar Siddharth Kaul Receives First Dose Of Covid Vaccine

क्रिकेटपटूंना व्हॅक्सिन:स्मृती मंधाना लस घेणारी पहिली महिला खेळाडू, बुमराहसहित आणखी 3 खेळाडूंनी घेतला पहिला डोस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोनाविरूद्ध दंड थोपटले आहेत. भारतीय महिला संघाची ओपनर स्मृती मंधाना, पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, दीपक चहर आणि सिद्धार्थ कौल यांनी मंगळवारी लस घेतली. यासह त्यांनी चाहत्यांनाही सुरक्षित राहण्याचे आणि लस घेण्याचे आवाहन केले. यापूर्वी सोमवारी विराट कोहली, उमेश यादव, ईशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनीही लस घेतली.

मंधाना लस घेणारी पहिली महिला खेळाडू
मंधाना लस घेणारी महिला क्रिकेट टीममधील पहिली खेळाडू आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिने ही माहिती दिली. तसेच लोकांनाही लस घेण्याचे आवाहन केले.भारतीय पुरुष संघ तसेच महिलांचा संघही इंग्लंडचा दौरा करणार आहे. महिला संघ इंग्लंडमध्ये 16 जून ते 15 जुलै दरम्यान 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. मंधाना देखील या संघाचा एक भाग आहे. यानंतर ती द हंड्रेड टूर्नामेंटमध्येही भाग घेणार आहे. 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

इंग्लंड दौर्‍यापूर्वी बुमराहने लस घेतली
भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहने पहिला डोस घेतला. मी लस घेतल्याचे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सर्वजण सुरक्षित राहा असेही सांगिलते. इंग्लंड दौर्‍यावर जाणाऱ्या संघामधून लस घेणारा तो सहावा खेळाडू आहे. टीम 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल आणि 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध साऊथॅम्प्टन येथे जागतिक कसोटी चँपियनशिप फायनल खेळेल. यानंतर टीम इंडियाला सुमारे दीड महिने यूकेमध्ये काढावे लागतील. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...