आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी मिनी ऑलिम्पिक स्पर्धेतील चॅम्पियन स्नेहा मदनेला दर्जेदार शूज व ट्रॅकसूट देण्याची घाेषणा केली. तिने गुरुवारी पुण्यात सुवर्णपदक पटकावले. तिने दर्जाहीन आणि स्वस्तातील शूजवर तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकले. हे वृत्त दैनिक दिव्य मराठीने प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत स्वत: क्रीडामंत्री महाजन यांनी घाेषणा केली.
क्रीडामंत्र्यांकडून मिळणारी भेट आत्मविश्वास दुणावणारी: स्नेहा क्रीडामंत्री महाजन यांच्याकडून मला दर्जेदार शूज मिळत आहेत. ही भेट माझ्यासाठी आत्मविश्वास दुणावणारी आहे. यातून मी साेनेरी यश मिळवेल, अशा शब्दांत स्नेहाने आनंद व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.