आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Snooker: O'Sullivan, 46, England's Oldest World Champion; 4.8 Crore, A Record Seventh World Cup Win

दिव्य मराठी विशेष:स्नूकर : इंग्लंडचा 46 वर्षीय ओ सुलिवान सर्वात वयस्कर वर्ल्ड चॅम्पियन; 4.8 कोटींचा मानकरी, विक्रमी सातव्यांदा पटकावला विश्वचषक

शेफील्ड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या रॉनी ओ सुलिवानने पुन्हा एकदा स्नूकरमध्ये विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. त्याने विश्वविक्रमी सातवा वर्ल्ड टायटल आपल्या नावे केला. यासह त्याने मॉडर्न इरामध्ये (१९६९ पासून) सर्वाधिक किताब विजेत्या हेंड्रीच्या विक्रमाची बरोबरी साधली. याशिवाय आता इंग्लंडचे ४६ वर्षीय ओसुलिवान हे जगातील सर्वात वयस्कर विश्वविजेते ठरले. सर्वाधिक १५ टायटल जिंकण्याचा विक्रम इंग्लंडच्या जाेए डेव्हिसच्या नावे नोंद आहे. ओसुलिवानने दोन दिवसांच्या फायनलमध्ये आपल्याच देशाच्या जुड ट्रम्पला पराभूत केले. त्याने १८-१३ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. ३२ वर्षीय ट्रम्पने दुसऱ्या सेशनमध्ये ६ फ्रेमपैकी चार जिंकून सामना आपल्या नावे केला होता. मात्र, फायनलमध्ये रॉकेट नावाने लाेकप्रिय असलेल्या ओसुलिवानने विजय संपादन केला. त्याला किताबासह ४.८ कोटींचे बक्षीस देऊन गाैरवण्यात आले.

आता मॉडर्न इरामध्ये सर्वाधिक किताब विजेत्या हेंड्रीशी साधली ओ सुलिवानने बरोबरी

बातम्या आणखी आहेत...