आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra Teams Won Their Second Match In A Row, The Best Success Of The Teams In The National Tournament In Odisha

Softball:महाराष्ट्र संघांनी जिंकला सलग दुसरा सामना, ओडिशातील राष्ट्रीय स्पर्धेत संघांचे माेठे यश

पुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने आत्मवि‌श्वास दुणावलेल्या महाराष्ट्र महिला आणि पुरुष संघांनी मंगळवारी ४४ व्या राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला. यासह महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांनी आपापल्या गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. यातून महाराष्ट्र संघांना गटातील साखळी सामने जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवता आली. महाराष्ट्र पुरुष संघाने दुसऱ्या सामन्यात जम्मू- काश्मीरवर ७-० होमरनने मात केली. यासह टीमला माेठा विजय साजरा करता आला आहे.

तसेच महाराष्ट्र संघाने महिलांच्या गटातील दुसऱ्या सामन्यात पश्चिम बंगालचा १०-० हाेमरनने पराभव केला. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाच्या गौरव चौधरी याने लक्षवेधी कामगिरी केली. सामन्यांमध्ये स्वप्निल गदादे, राज भिलारे, प्रतीक डुकरे, मोनाली नातू, सई जोशी, स्वप्नाली वायदंडे, ऐश्वर्या पुरी, ऐश्वर्या बोडखे यांनी उत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघास विजय प्राप्त करून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांची यादरम्यानची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

स्पर्धेत सध्या या दोन्ही संघांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, प्रसेनजित बनसोडे, चेतन महाडिक, गणेश बेटुदे, ऐश्वर्या भास्करन यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...