आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Some Will Realize Their Childhood Dream Of Being A Runner In Their Thirties

80 वर्षांच्या धावपटूंचा 160 किमी धावण्याच्या शर्यतीत सहभाग:तिशीतून साकारणार काही जण धावपटू हाेण्याचे बालपणीचे स्वप्न

न्यूयाॅर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेमध्ये नुकतीच १०० मैल म्हणजेच १६० किमी धावण्याच्या ट्रॅक अँड फील्ड राेड चॅम्पियनशिपमधील (यूएसएटीएफ) माेजक्या धावपटूंचा सहभाग लक्षवेधी ठरला. कारण हे धावपटू वयाच्या ८० व्या वर्षी या शर्यतीत सहभागी झाले हाेते. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी रेसमध्ये सहभागी हाेऊन हे अंतर गाठले. त्यांनी हे अंतर २९ तासांमध्ये गाठल्याचे समाेर आले. यातून या उत्साही धावपटूंनी इच्छाशक्ती आणि जिद्द असली की काेणत्याही प्रकारचे अडसर निर्माण हाेत नाहीत. या सर्वांवर मात करण्याची नवीन ऊर्जा मिळते. यातून अशक्य वाटणाऱ्या गाेष्टींवर सहज मात करता येते, असे ८० वर्षीय धावपटू इयान मॅडिसन यांनी सांगितले. त्यांच्यासह या रेसमध्ये ८३ वर्षीय एडी रुसाे, ८० वर्षीय डेनिस ट्रेफ्रेंकैटी सहभागी झाले हाेते. यासह त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रेसमध्ये ८० ते ८४ वर्षांखालील गटामध्ये डेव्हिड ब्लेलाॅक चॅम्पियन ठरले. त्यांनी ही रेस २९ तास ४९ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेतील वयस्कर हे सध्या धावण्याच्या माध्यमातून याेग्य आहार घेत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

४० तासांत पूर्ण करण्याचे टार्गेट : ८० ते ८४ वर्षांखालील गटात सहभागी हाेणाऱ्या धावपटूंसाठी १६० किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी ४० तासांचे टार्गेट असते. मात्र, नियमित सराव आणि मॅरेथाॅनमधील सहभागाचा अनुभव असल्याने हे वयस्कर धावपटू ३० ते ३२ तासांतच हे अंतर यशस्वीपणे गाठतात. यासाठी नियमित सराव आमच्यासाठी फायदेशीर ठरत आहे, अशी प्रतिक्रिया या धावपटूंनी दिली.

धावपटू हाेण्यावर अधिक भर : सध्या वयस्कर हे फिट राहण्यासाठी जिमसाेबतच धावण्याचा सराव करतात. यातून त्यांचा मॅरेथाॅनमधील सहभाग वाढत आहे. याशिवाय सध्या मॅरेथाॅनमध्ये ४० ते ८५ वर्षांखालील वयाेगट ठेवले जातात. यातून या गटात सहभागी हाेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.