आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sourav Ghoshal Gives India First Medal In Squash Singles, Tulika Mann Gets Silver In Judo

राष्ट्रकुल स्पर्धेचा सहावा दिवस:सौरव घोषालने स्क्वॉश एकेरीत भारताला दिले पहिले पदक, तुलिका मानला ज्युडोमध्ये मिळाले रौप्यपदक

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दोन कांस्य आणि एक रौप्यपदक मिळाले. वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात हे पदक जिंकले. त्याचवेळी भारताची ज्युडो खेळाडू तुलिका मानने 78 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक मिळवुन दिले. अंतिम सामन्यात तिला स्कॉटलंडच्या सारा एडलिंग्टन हिच्याकडून हार पत्करावी लागली. तत्पूर्वी, तिने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सिडनी अँड्र्यूजचा 10-1 असा पराभव केला होता आणि उपांत्यपूर्व फेरीत मॉरिशसच्या ट्रॅशी डरहोनचा पराभव केला होता.

सौरव घोषालने रचला इतिहास
याआधी सौरव घोषालने स्क्वॉशमध्ये भारतासाठी इतिहास रचला आहे.त्याने महिला आणि पुरुष एकत्र गटात राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले. सौरवने जेम्स विल्स्ट्रॉपचा 3-0 असा पराभव केला. पहिला गेम त्याने 11-6 असा जिंकला आणि दुसरा गेमही 11-1 ने जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सौरवने विल्स्ट्रॉपचा 11-4 असा पराभव केला.

भारताची विजयी घोडदौड सुरुच....
दरम्यान, यावर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत 16 पदके मिळाली आहेत ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.विशेष म्हणजे यातील नऊ पदके ही वेटलिफ्टिंग या खेळातुन मिळाली आहे.त्याचबरोबर ज्युडोमध्ये भारताला तीन तर लॉन बॉल्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि स्क्वॉशमध्ये एक- एक पदके मिळाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...