आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:हाॅलंडविरुद्ध पहिल्यांदाच पराभूत हाेऊन दक्षिण आफ्रिका संघाचे पॅकअप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवख्या नामिबिया संघाने पहिल्याच दिवशी सुरू केलेली सनसनाटी विजयाची माेहीम हाॅलंड संघाने गटातील शेवटच्या सामन्यापर्यंत कायम ठेवली. स्काॅट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखाली हाॅलंड संघाने रविवारी ब गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात तेंबा बावुमाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सनसनाटी विजय संपादन केला. हाॅलंड संघाने १३ धावांनी आफ्रिकेला धूळ चारली. हाॅलंडविरुद्ध पहिल्यांदाच पराभूत झालेल्या आफ्रिका संघाला वि‌श्वचषकातून पॅकअप करावे लागले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या आफ्रिकेला विजयाने उपांत्य फेरी गाठण्याची संधी हाेती. मात्र, हाॅलंडने धक्कादायक निकालातून आफ्रिकेच्या आशेवर पाणी फेरले. हाॅलड संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेला निर्धारित २० षटकांत १४५ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह आफ्रिकेला आतापर्यंतच्या सात सामन्यात हाॅलंडविरुद्ध पहिला पराभव पत्करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...