आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Spain France Winning Start, 2010 Winners Spain Thrash Costa Rica 7 0, France Beat Australia 4 1

साखळी फे:स्पेन-फ्रान्सची विजयी सुरुवात, 2010 चा विजेता स्पेनची कोस्टारिकावर 7-0, फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर 4-1 ने मात

दोहा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१० च्या विजेत्या स्पेनने चॅम्पियन्सप्रमाणे खेळ खेळला. त्यांनी गट ई सामन्यात कोस्टा रिकाचा ७-० असा पराभव केला. स्पेनचा विश्वचषकातील हा सर्वात मोठा विजय आहे. डॅनी ओल्मो (११ व्या), मार्को एसेन्सिओ (२१ व्या), फेरान टोरेस (३१ व्या मिनिटाला आणि ५४ व्या मिनिटाला पेनल्टी), गावी (७४ व्या मिनिटाला), कार्लोस सोलर (९० व्या) आणि अल्वारो मोराटा (९०+२) यांनी अतिरिक्त वेळेत गोल केले. मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत (वर्ल्ड कप+युरोपियन चॅम्पियनशिप) स्पेनसाठी गोल करणारा गावी हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

ओल्मोने सामन्यातील पहिला गोल केला, स्पेनचा विश्वचषकातील १०० वा गोल होता. या विजयासह स्पेनची कोस्टारिकाविरुद्धची अपराजित मोहीम कायम राहिली. दोन्ही संघांमधील ही चौथी लढत होती. यात स्पेनने सलग तिसरा विजय मिळवला. दोघांचा एक सामना अनिर्णीत राहिला. चेंडूचा ताबा स्पेनकडे ८२% आणि कोस्टारिकाकडे १८% होता.

मोरक्को-क्रोएशिया लढत ड्राॅ अल बेत स्टेडियममध्ये मोरक्कोने उपविजेत्या क्रोएशियाला बरोबरीत राेखले. दोन्ही संघ निर्धारित वेळेत गोल करू शकले नाही.

फ्रान्सच्या ऑलिव्हियरचे २ गोल अल वकरा | फ्रान्सने विश्वचषकातील आपले अभियान मोठ्या विजयाने सुरू केले. सध्याचा चॅम्पियन फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला ४-१ ने हरवले. तो किताबाचा दावेदार असल्याचे दाखवून दिले. फ्रान्सने चॅम्पियनसारखा खेळ खेळत सुरुवातीलाच सामन्यावर वर्चस्व मिळवले. संघाच्या आड्रियन राबियोने २७ व्या, ऑलिव्हियर जिरूने ३२ व्या व ७१ व्या आणि किलियन एमबापेने ६८ व्या मिनिटाला गोल केला. जिरूने दुसरा गोल हेडरद्वारे केला व फ्रान्सचा सर्वाधिक गोल करणारा थिएरे हेन्रीशी बरोबरी केली. जिरूचे ११५ सामन्यात ५१ गोल झाले, तर हेन्रीने १२३ सामन्यात ५१ गोल केले आहेत. प्रशिक्षक डिडियर डेस्चॅप्सच्या रणनीतीनुसार, जिरू हा करीम बेंझेमाचा बॅकअप खेळाडू होता. मात्र, बेंझेमा बाहेर झाल्याने जिरूला आघाडीवर खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले. फ्रान्सचा संघ विश्वचषकापूर्वी व आताही जखमी खेळाडूंमध्ये त्रस्त आहे. किम्पेबे, कॉन्टे, पोग्बा व स्ट्रायकर क्रिस्टोफर दुखापतीमुळे बाहेर झाले.

बातम्या आणखी आहेत...