आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Spain, New Zealand Win Shootout; India Beat Malaysia, New Zealand Beat India 5 4

विश्वचषक हाॅकी:स्पेन, न्यूझीलंड शूटआऊटमध्ये विजयी; भारत, मलेशिया पराभूत, 5-4 ने न्यूझीलंडची भारतावर मात

भुवनेश्वर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटआउटदरम्यान श्रीजेशला दुखापत. - Divya Marathi
शूटआउटदरम्यान श्रीजेशला दुखापत.

फाॅर्मात असलेल्या स्पेन आणि न्यूझीलंड संघांनी रविवारी राेमहर्षक विजयाने विश्वचषक हाॅकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. यादरम्यान क्राॅस आेव्हर सामन्यात यजमान भारतासह मलेशिया संघांना पराभवाचा सामना करावा लागला. या दाेन्ही संघांचा पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव झाला. स्पेन संघाने क्राॅसआेव्हर सामन्यात मलेशियाचा पराभव केला. स्पेन संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने विजय संपादन केला. त्यापाठाेपाठ न्यूझीलंड संघाने सामन्यात भारतावर पेनल्टी शुटआऊटमध्ये ५-४ ने मात केली. हा सामना निर्धारित वेळेत ३-३ ने बराेबरीत हाेता. या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दाेन्ही संघांच्या सर्वाेत्तम खेळीमुळे हा रंगतदार सामना निर्धारित वेळेत २-२ गाेलने बराेबरीत राहिला हाेता. त्यानंतर स्पेन संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. निर्धारित वेळेत स्पेन संघाकडून मार्क मिरालेस आणि जेव्हियर गिस्पर्टने प्रत्येकी एक गाेल केला. तसेच मलेशिया संघासाठी फैजल सारी आणि शैलाे सिल्वारियसने प्रत्येकी एक गाेल केला हाेता. त्यामुळे हा सामना २-२ ने बराेबरीत राहिला. त्यानंतर स्पेन संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये सुरेख खेळी करत विजय साजरा केला. यादरम्यान मलेशिया संघाला सहा संधीमध्ये तीन गाेल करता आले. स्पेन संघाने चार गाेल करून बाजी मारली.

या विजयासह स्पेन संघाला अंतिम आठमधील प्रवेश निश्चित करता आला. आता स्पेन टीमला या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. उद्या मंगळवारी स्पेन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. स्पेन पुरुष संघाने १६ वर्षांनंतर हाॅकी विश्वचषक स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी केली. यापूर्वी संघाने २००६ मध्ये लक्षवेधी खेळी केली हाेती. यादरम्यान स्पेन संघ तिसऱ्या स्थानी हाेता. यासाठी स्पेन संघाने राेमांचक लढतीत दक्षिण काेरियावर मात केली हाेती. तसेच स्पेन संघ २०१० मध्ये पाचव्या, २०१४ मध्ये सातव्या स्थानावर राहिला. २०१८ मध्ये संघाला गटातूनच बाहेर पडावे लागले.

बातम्या आणखी आहेत...