आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअब्देलहमिद सबीरी, हाकिम जियेच आणि अचरफ हकिमीने अचूक गाेल करून माेराेक्काे संघाला फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत एेतिहासिक यश मिळवून दिले. या गाेलच्या बळावर माेरोक्काे संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये २०१० च्या चॅम्पियन स्पेन टीमला धूळ चारली. आफ्रिकन टीम माेराेक्काेने ३-० ने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय संपादन केला. निर्धारित वेळेत हा सामना शून्य गाेलने बराेबरीत राहिला. या विजयासह माेरोक्काे संघाने करिअरमध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला. स्पर्धेतून पॅकअप करणारा स्पेन हा यंदाच्या विश्वचषकातील तिसरा चॅम्पियन संघ ठरला. यंदा चॅम्पियन जर्मनी आणि उरुग्वे संघ बाहेर झाले.
स्पेनमध्ये जन्मलेल्या हकिमीचा माेरोक्काेसाठी निर्णायक गाेल मोरोक्को संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन गाेल केले. यामध्ये स्पेनमध्ये जन्मलेल्या हकिमीने एका गाेलचे याेगदान दिले. स्पेन संघाचे पाब्लाे सराबिया, कार्लाेस साेलेर आणि सर्जियाे बस्केट्स हे तिघेही शूटआऊटमध्ये अपयशी ठरले. माेरोक्काे संघाच्या गाेलरक्षक यासिने बाेनाेऊने सर्वाेत्तम कामगिरीतून स्पेन टीमचे गाेलचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे संघाला पराभवाला सामाेरे जावे लागले. दरम्यान, स्पेनचा गाेलरक्षकही अपयशी ठरला.
शूटआऊटमध्ये स्पेनचे ४ पराभव vs बेल्जियम परा. 5-4 (1986) vs आयर्लंड विजय 3-2 (2002) vs द. कोरिया परा. 5-3 (2002) vs रशिया परा. 4-3 (2018) vs मोरोक्को परा. 3-0 (2022)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.