आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sport News |Former Pakistan Captain Rushed To Hospital After Chest Pain | Inzmam Ul Haque Got Heart Attack

इंझमामला हृदयविकाराचा झटका:पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमामला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल; सचिन तेंडुलकरने केले ट्वीट, म्हणाला...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर फलंदाज इंझमाम उल हकला हृदयविकाराचा झटका आला आहे. सोमवारी इंझमामवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. इंझमामला गेल्या तीन दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी सर्वकाही प्राथमिक वैद्यकीय चाचण्याही केल्या. मात्र सोमवारी इंझमामला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे निदान झाले.

या घटनेनंतर क्रिकेटविश्वातून अनेक खेळाडूंनी इंझमामसाठी प्रार्थना केली आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही इंझमामसाठी एक ट्वीट केले आहे. . सचिनने लिहिले, इंझमामला तू लवकर बरा हो, 'मला हेच हवे आहे. तू नेहमीच शांत पण मजबूत आणि मैदानावर एक फायटर राहिला आहेस. मी आशा आणि प्रार्थना करतो, की तू या परिस्थितीतून बाहेर पडशील. लवकर बरा हो.' सचिन व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गज व्यक्तींनी इंझमामच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. 2007 साली इंझमाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेटसंबंधित अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तो आधी पाकिस्तानच्या संघासाठी फलंदाजी सल्लागार होता. नंतर 2016 ते 2019 दरम्यान तो पाकिस्तानी संघ निवडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख निवडकर्ता म्हणून कार्यरत होता. इंझमामने अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...