आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sport News Update | Maharashtra Boys Win The 40th Kumar National Championship Kho Kho Championship

महाराष्ट्र अजिंक्य:महाराष्ट्राच्या मुलांची 40 व्या कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजयी सलामी, नागालँडवर 32-6 असा 1 डाव राखून 26 गुणांनी मिळवला विजय

अजितकुमार संगवे l भुवनेश्वर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या मुलांनी ४० व्या कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेची दणदणीत विजयी सलामी दिली आहे.

येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर बुधवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. यंदा तिन्ही कोर्ट मॅटची करण्यात आली आहेत. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने नागालँडवर ३२-६ असा१डाव राखून २६ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. नाणेफेक जिंकून प्रथम पळती करणाऱ्या महाराष्ट्राच्या ६ पैकी ५ संरक्षकाना नागालँडला बाद करता आले नाहीत. ४ संरक्षक स्वतःहून बाद झाले तर एकजण निवृत्त झाला.

महाराष्ट्र विरुद्ध नागालँड मुलांच्या सामन्यातील टिपलेला क्षण
महाराष्ट्र विरुद्ध नागालँड मुलांच्या सामन्यातील टिपलेला क्षण

महाराष्ट्राच्या धारदार अक्रमनामुळे नागालँडच्या संरक्षकाचा मैदानात टिकावे लागला नाही. महाराष्ट्राकडून सूरज जोहरे, विवेक ब्राह्मणे व भगतसिंग वसावे यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी ५ गडी टिपले. भगतसिंगने नाबाद १.५० तर सौरभ अहिरने २.३०मिनीटे संरक्षणाची खेळी केली. रवी वसावे (१.२०मिनिटे व २गुण) व आदित्य कुदळे (१.३०मिनिटे व ४गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. मध्यंतरानंतर नागालँडने सामना सोडुन दिला. मुलींचा नागालँड संघ न आल्यामुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला पुढे चाल मिळाली.

बातम्या आणखी आहेत...