आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात खेळासाठी भरीव तरतूद केली आहे. यावेळचा अर्थसंकल्प क्रीडा जगतासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. भारतीय खेळाडू या वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याबरोबरच 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करणार आहेत. यासाठी क्रीडा मंत्रालयाला सरकारने क्रिडा विभागासाठी 3,397.32 कोटी रुपयांची तरतूद केल्याने जवळपास 723.97 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
2022-23 ला मिळालेल्या एकून रक्कम 3062 कोटी रूपयांपैकी क्रिडा मंत्रालयाला 2673.35 कोटीच रूपये मिळाले होते त्यामागचे कारण की हॅंगझो आशियाई क्रिडा स्पर्धा या पुढे ढकलल्या होत्या. मात्र त्या स्पर्धा यावेळी होण्याची शक्यता आहे.
खेलो इंडियासाठी मोठी तरदूत
क्रिडा मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम म्हणजे 'खेलो इंडिया - नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्पोर्ट्स' हा सरकारचा अग्रक्रम कायम आहे, मागील आर्थिक वर्षात 606 कोटी रुपयांच्या सुधारित वाटपाच्या तुलनेत 1,045 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.
ही 439 कोटी रुपयांची वाढ आहे आणि या कार्यक्रमासाठी सरकारचे विशेष लक्ष आहे. ज्यात ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ यासारख्या प्रमुख जागतिक स्पर्धांसाठी खेळाडू तयार करण्यासाठी आवश्यकता लक्षात घेऊन रक्कमेत वाढ करण्यात आली.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) 36.09 कोटी रुपयांची वाढ
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), जे क्रीडापटूंसाठी राष्ट्रीय शिबिरे आयोजित करणे, खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि उपकरणे प्रदान करणे, प्रशिक्षकांची नियुक्ती आणि क्रीडा पायाभूत सुविधा राखणे यासह इतर गोष्टींची काळजी घेते, त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये 36.09 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षीचा सुधारित खर्च रु. 749.43 कोटी. 2023-24 साठी त्यांचे वाटप 785.52 कोटी रुपये आहे.
राष्ट्रीय क्रीडा महासंघांना वाढीव मदत
राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSFs) मागील वर्षीच्या 280 कोटी रुपयांच्या सुधारित बजेटमधून 45 कोटी रुपयांचे वाढीव वाटप मिळाले आहे आणि आता 325 कोटी रुपये मिळतील.
NADA आणि NDTL थेट निधी मिळणार
नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA), वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) शी संलग्न आणि राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा (NDTL), ज्यांना आधी SAI कडून निधी मिळत होता, आता त्यांना थेट निधी मिळेल.
यंदाच्या अर्थसंकल्पात नाडाला 21.73 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे, तर चाचण्या घेणाऱ्या NDTL 19.50 कोटी रुपये मिळणार आहेत.
राष्ट्रीय क्रीडा विज्ञान केंद्रासाठी तरतूद
जगभरातील देश क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असून क्रीडा विज्ञान आणि खेळाडूंच्या वैज्ञानिक प्रशिक्षणाकडे अधिक लक्ष देत असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय क्रीडा विज्ञान केंद्रासाठी 13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
क्रीडा अर्थसंकल्प 2023-24
खेलो इंडिया: रु. 1045 कोटी
SAI: 785.52 कोटी
राष्ट्रीय क्रीडा महासंघ: 325 कोटी
राष्ट्रीय सेवा योजना: 325 कोटी
राष्ट्रीय क्रीडा विकास निधी: रु. 15 कोटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.