• Home
  • Sports
  • Sports players in Crisis: It's time for Aurangabad gymnast Ranjit Pawar to ask for grain

कोण ऐकेल आमचे / संकटात खेळाडू : कराटे पदकविजेत्या हनीवर धान्य मागण्याची, औरंगाबादचा जिम्नॅस्ट रणजित पवारवर आली दूध विकण्याची वेळ

  • लॉकडाऊनमुळे ट्रेनिंग देणारे, जिम चालवणारे खेळाडू दोन महिन्यांपासून बेरोजगार

दिव्य मराठी

May 20,2020 09:11:13 AM IST

नवी दिल्ली. जागतिक पातळीवर देशाचा सन्मान वाढवणाऱ्या अनेक खेळाडूंची लॉकडाऊनमध्ये हिंमत खचली आहे. फिटनेसच नव्हे तर उपजीविकेचीही अडचण झाली आहे. प्रशिक्षण देणे व जिम चालवणारे खेळाडू दोन महिन्यांपासून बेरोजगार आहेत. स्थिती कधी सुधारेल हे माहिती नाही. त्यामुळे काहींना कुटुंबाची मदत घ्यावी लागत आहे, तर काहींनी दुसरी कामे सुरू केलीत.

जिम्नॅस्टिक : रणजित म्हणाले- दूध विकण्याशिवाय पर्याय नाही

महाराष्ट्रातील औरंगाबादचे जिम्नॅस्ट रणजित पवारने १९९६-९७ मध्ये बुडापेस्ट व हंगेरीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णासह पाच पदके पटकावली. २० राष्ट्रीय पदके जिंकली. या छत्रपती पुरस्कार विजेत्याला आता सर्व काही बंद असल्याने वडिलांसोबत दूध विकण्याशिवाय पर्याय नाही. सध्या ते अकादमी चालवत आहेत. ऑनलाइन कोचिंगही देत आहेत.

कराटे | कोचिंग बंद, उधारी वाढली, आता धान्य मागतेय हनी

ऑल इंडिया युनिव्हर्सिटीची पदक विजेती हनी गुर्जर लॉकडाऊनमुळे कोचिंग देऊ शकत नाही. शाळा व कराटेची सर्व केंद्रे बंद आहेत. ग्वाल्हेरच्या हनीच्या आईला हृदयविकार आहे. बचतीतून काही दिवस खर्च भागला. आता अडचण होत आहे. कोचकडून उसनवारही झाली. आता संस्था व लोकांकडून धान्य मागून पोट भरावे लागत आहे. ती म्हणाली, पदक जिंकल्यानंतर खूप सन्मान मिळाला. मात्र आज हात पसरावे लागत आहेत. तिचे वडील लोणची विकतात.

नेमबाजी | ऑनलाइन ट्रेनिंग देत आहे नेमबाज राजकुमारी

मप्र अकादमीची पहिली अर्जुन विजेती नेमबाज राजकुमारी राठोड इंदूरच्या खासगी शाळेत नेमबाज केंद्र चालवते. १७ आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारी राजकुमारी क्रीडा शिक्षक म्हणून ५० शाळांमध्ये प्रशिक्षण देते. दोन महिन्यांपासून वेतन नाही. वडील व भावाच्या मदतीने घर चालवत आहे. सरकारकडून मदत नाही. आता मुलांना ऑनलाइन ट्रेनिंग देत आहे.

क्रिकेट |

आरसीए सहा. संचालक राहिलेले मोहन उसनवारी घर चालवताहेतमोहन सिंह राजस्थानसाठी जलदगती गोलंदाज म्हणून रणजी खेळले आहेत. आरसीएचे सहायक संचालकही होते. जयपूरमध्ये अकादमी सुरू केली. त्यातून खर्च भागायचा. अकादमीत ८० मुले होती. लॉकडाऊनमध्ये ५० हजार उसनवार घेतले आहेत. दुसरे एक रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे हॉटेल आणि अकादमी दोन्ही बंद आहेत.

शरीरसौष्ठव |

संदीप म्हणाले- जिम बंद, भाजी विकून घर चालवणारदिव्यांग गटातून मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव संदीप साहू आता आई-वडिलांवर अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे संदीपची जिम बंद आहे. जी त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. रायपूरमध्ये राहणाऱ्या संदीपने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत १३ सुवर्णपदके जिंकली आहेत. संदीपने सांगितले की, माझ्याकडे काम नाही. जिम केव्हा सुरू होईल माहीत नाही. पण मी आता भाजी विकेन, ज्यातून घर चालवता येईल.


X