आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याच्या बालेवाडीमध्ये गत १५ वर्षांपासून स्पाेर्ट््स सायन्स सेंटर कार्यरत आहे. याचा क्रीडा प्रबाेधिनीसह इतर विभागाच्या ५०० पेक्षा अधिक खेळाडूंना फायदा हाेत आहे. असे असतानाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पुण्यात स्पाेर्ट््स सायन्स सेंटर उभारणीची नव्याने घाेषणा केली आहे. मात्र, हे सेंटर या ठिकाणी २००८ पासून अविरतपणे कार्यरत आहे. त्यामुळे ही घाेषणा शाेभेची ठरत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पादरम्यान केलेली ही घाेषणा आता चर्चेत आली आहे. कारण या सेंटरला आता अद्ययावत करण्याची गरज आहे. मात्र, उभारणीसाठीची घाेषणा झाली.
पुण्यात २००८ मध्ये सुरुवात तत्कालीन क्रीडामंत्री वसंत पुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये २००८ मध्ये स्पाेर्ट््स सायन्स सेंटर सुरू करण्यात आले. यादरम्यान सुरुवातीला जवळपास २० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून या ठिकाणी साहित्यांसह लॅब सुरू करण्यात आली हाेती. हे सेंटर राज्यात पहिल्यांदाच यादरम्यान सुरू झाले हाेते. त्यामुळे हे निश्चितपणे चालना देणारे ठरले हाेते.
गत १० वर्षे घरघर; बकाेरिया यांच्यामुळे मिळाली चालना
पुण्यातील सायन्स सेंटर हे २००८ नंतर दाेन वर्षे नियमित सुरू राहिले. मात्र, त्यानंतर त्या सेंटरला घरघर लागली. यासाठीचा आवश्यक निधी आणि सुविधांचा अभाव हाेता. यामुळेच हे सेंटर काहीसे अडगळीत पडले हाेते. त्यामुळे जवळपास २०१७ पर्यंत हे सेंटर बंद स्वरूपातच हाेते. मात्र, त्यानंतर तत्कालीन क्रीडा आयुक्त आेमप्रकाश बकाेेरिया यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे या सेंटरला नवसंजीवनी मिळाली. यादरम्यान ८० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे हे सेंटर कार्यरत झाले.
१.५० काेटीचा खर्च; रिव्हॅब, दुखापतींवर मात
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे सध्या क्रीडा प्रबाेधिनी आणि बालेवाडीतील इतर खेळांतील खेळाडू या सेंटरचा वापर करतात. या ठिकाणी रिव्हॅबसह गंभीर दुखापतीवर मात करण्यासाठीच्या सुविधा पुरवल्या जातात. यासाठी केंद्राच्या याेजनेतून दाेन तज्ज्ञ फिजिओ कार्यरत आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाने करारबद्ध केलेले दाेन फिजिओही आहेत. त्यामुळे खेळाडूंना याचा फायदा हाेत आहे. सुविधा बीसीसीआयच्या एनसीएप्रमाणेच मिळत असल्याची खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत या सेंटरवर दीड काेटीचा खर्च झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.