आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • SportsCricketIndia Vs England 3rd T20 LIVE Score | Ishan Kishan Rohit Sharma Virat Kohli | Narendra Modi Stadium Ahmedabad News | IND Vs Eng Live Cricket Score Latest News Update

इंडिया vs इंग्लंड तिसरा टी-20:कोहलीच्या अर्धशतकावर बटलरचे अर्धशतक वरचड; इंग्लंडकडून भारताचा पराभव

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल 4 टी-20 मध्ये तिसऱ्यांदा शून्यावर आउट

भारत आणि इंग्लंडदरम्यान 5 टी-20 सीरीजचा तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 8 गडी राखून पराभव झाला. यासोबतच 5 टी-20 च्या सीरीजमध्ये 2-1 ने आघाडी मिळाली आहे. इंग्लंडच्या विजयाचे श्रेय इंग्लिश ओपनर जोस बटलरचे आहे. बटलरने 52 बॉलवर 83 रनांची खेळी केली. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

भारतीय टीमने इंग्लंडसमोर 157 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघाने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 69 धावा केल्या. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने टी-20 करिअरचे 27वे अर्धशतक झळकावले आहे.

भारतीय टीमने 6 विकेट गमावून 156 रन केले. कर्णधार विराट कोहलीने 46 बॉलवर सर्वाधिक 77 रनांची खेळी केली. हार्दिक पंड्याने 15 बॉलर 17 आणि ऋषभ पंतने 20 बॉलवर 25 रन केले. याशिवाय कोणताच फलंदाज 20+ धावा करू शकला नाही.

कोहली आणि हार्दिकच्या पार्टनरशिपने संघाला सावरले

टीम इंडियाची सुरुवात खराब होती. टीमने 24 रनांवर 3 विकेट गमावल्या. ओपनर लोकेश राहुल शून्यावर, तर रोहित शर्मा 15 रनावर आउट झाले. ईशान किशन तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला आणि 9 बॉलमध्ये 4 रन काढून आउट झाला. यानंतर कोहलीने ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 38 रनांची पार्टनरशिप केली. यानंतर पंत रनआउट झाला.

रोहित आणि ईशान आउट

इग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने भारतीय टीमला 20 रनांवर दुसरा झटका दिला. बुडने रोहित शर्मा (15 रन) ला जोफ्रा आर्चरकडे झेलबाद केले. यानंतर क्रिस जॉर्डनने आपल्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ईशान किशनला कॅच आउट केले. ईशानने 9 बॉल खेळून फक्त 4 रन केले.

राहुल 4 टी-20 मध्ये तिसऱ्यांदा शून्यावर आउट

भारतीय ओपनर लोकेश राहुल सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. मार्क वुडने त्याला क्लीन बोल्ड केले. राहुलने मागच्या 4 टी-20 मध्ये फक्त एक रन केल्या आहेत.

दोन्ही संघ

इंडिया: लोकेश राहुल, रोहित शर्मा, ईशान किशन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दूल ठाकुर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.

इंग्लंड: जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, इयोन मोर्गन (कर्णधार), सैम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि आदिल राशिद.

बातम्या आणखी आहेत...