आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:श्रीजेश, सविताला ‘वर्ल्ड हॉकी गोलकीपर ऑफ द इयर’ पुरस्कार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या पीआर श्रीजेश आणि सविता पुनिया यांना वर्ल्ड हॉकी गोलकीपर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले. श्रीजेशने १६ वर्षांच्या कारकीर्दीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या वर्षी हॉकी प्रो लीगच्या सर्व १६ सामन्यांमध्ये भाग घेतला होता. या लीगमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर राहिला. यासोबतच श्रीजेश राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही सदस्य होता. या पुरस्कारासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीजेशला ३९.९ गुण मिळाले. बेल्जियमचा लॉइक व्हॅन डोरेन २६.३ गुणांसह दुसऱ्या तर नेदरलँडचा प्रिमिन ब्लॅक २३.२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. त्याचप्रमाणे सविता ३७.६ गुणांसह प्रथम आली, तर अर्जेंटिनाची बेलेन सुसी द्वितीय आणि ऑस्ट्रेलियाची जोसेलिन बार्टम तृतीय स्थानावर होती.

बातम्या आणखी आहेत...