आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण:श्रीसंतवर लागलेली 7 वर्षांची बंदी आज उठली; म्हणाला- परत खेळण्याची संधी मिळाल्यावर उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवेल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली पोलिसांनी 2013 आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात एस श्रीसंत, अजीत चंडिला आणि अंकित छवनला अटक केली होती

भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंतवर 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लागलेली 7 वर्षांची बंदी आज अखेर उठली आहे. श्रीसंत सोमवारपासून क्रिकेट खेळण्यासाठी स्वतंत्र आहे. यावर श्रीसंत म्हणाला की, आता मी सर्व आरोपातून मुक्त झालो आहे. मला परत खेळण्याची संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी करुन दाखवले.

37 वर्षीय श्रीसंत पुढे म्हणाला की, 'माझ्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी अजून 4-5 वर्षांचा वेळ आहे. या काळात मी ज्या कोणत्या टीमकडून क्रिकेट खेळेल, त्या टीमला माझी शंभर टक्के कामगिरी करुन दाखवले.' श्रीसंतने आपली फिटनेस दाखवली, तर पुढील डोमेस्टीक क्रिकेटमध्ये केरळकडून खेळताना दिसू शकतो.

2015 मध्ये स्पेशल कोर्टाने आरोपातून मुक्त केले

7 वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी मॅच फिक्सिंगच्या आरोपात श्रीसंत आणि राजस्थान रॉयल्समधील अजीत चंडिला आणि अंकित छवनला अटक केले होते. यानंतर बीसीसीआयने तिन्ही खेळाडूंवर बंदी घातली होती. परंतू, याविरोधात मोठी लढाई लढल्यानंतर 2015 मध्ये स्पेशल कोर्टाने श्रीसंतला सर्व आरोपातून मुक्त केले होते.

2 वर्षांपूर्वी हायकोर्टाने आजीवन बंदी हटवली होती

यानंतर 2018 मध्ये केरळ हायकोर्टाने श्रीसंतवर लावलेली आजीवन बंदी हटवली होती. पण, 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरील आरोपांना कामय ठेवत बीसीसीआयला शिक्षा कमी करण्यास सांगितले. यानंतर बोर्डाने आजीवन बंदी हटवून 7 वर्षांची बंदी लावली. आज अखेर तो या बंदीतून मुक्त होणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser