आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sri Lanka Champions For Sixth Time, Lankans Win By 23 Runs; Pakistan Team Lost By 147 Runs

आशिया कप:श्रीलंका सहाव्यांदा चॅम्पियन, लंका संघ 23 धावांनी विजयी; पाक संघाचा 147 धावांत ख‌ुर्दा

दुबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बल आठ वर्षांनंतर श्रीलंका संघाने जिंकला आशिया कप

सामनावीर भानुका राजपक्षे (नाबाद ७१) आणि प्रमाेद मदुशन (४/३४), मालिकावीर हसरंगा डिसिल्वाने (३/२७) लक्षवेधी कामगिरीतून श्रीलंका संघाला सहाव्यांदा आशिया कप विजेता हाेण्याचा बहुमान मिळवून दिला. दासुन शनाकाच्या कुशल नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने रविवारी आशिया कपच्या फायनलमध्ये दाेन वेळच्या चॅम्पियन पाकिस्तान टीमचा पराभव केला. श्रीलंका संघाने २३ धावांनी सामना जिंकला. पाकच्या गाेलंदाजांनी मैदानावर १५०+ च्या वेगाने टाकलेल्या चेंडूंचा सामना करताना श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या माेबदल्यात १७० धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला निर्धारित २० षटकांत सर्वबाद १४७ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. पाक संघाकडून सलामीवीर रिझवानने सर्वाधिक ५५ आणि अहमदने ३२ धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांचा फार काळ मैदानावर निभाव लागला नाही. प्रमाेद मदुशन आणि हसरंगाने निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यासह श्रीलंका संघाने यंदा टी-२० फाॅरमॅटचा आशिया कप जिंकला. या संघाने तब्ब्ल आठ वर्षांनंतर आशिया कप विजेत्या हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे. यापूर्वी श्रीलंका संघाने २०१४ मध्ये शेवटचा आशिया कप पटकावला हाेता. श्रीलंका संघाने सहाव्यांदा कपवर नाव काेरले आहे. यापूर्वी श्रीलंका संघ १९८६, १९९७, २००४, २००८ आणि २०१४ मध्येही आशिया कप विजेता ठरला हाेता. यासह श्रीलंका संघाने आता किताब विजयामध्ये दुसरे स्थान कायम ठेवले आहे. आता भारताच्या नावे सात आणि श्रीलंका संघाच्या नावे सहा वेळा आशिया कप विजेता हाेण्याची कामगिरी नाेंद झाली. दाेन वेळच्या चॅम्पियन पाकिस्तान संघाच्या गाेलंदाज हॅरिस रऊफ (३/२९), नसीम, शादाब आणि अहमदने (प्रत्येकी १ बळी) आपल्या भेदक माऱ्यातून रविवारी आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंका संघाचे कंबरडे माेडले. नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार बाबर आझमचा हा निर्णय गाेलंदाज रऊफ, नसीम, अहमद आणि शादाब खानने याेग्य ठरवला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंका संघाची निराशाजनक सुरुवात झाली. टीमने सुरुवातीच्या दहा षटकांदरम्यान ड्रिंक्सपर्यंत ५ गड्यांच्या माेबदल्यात फक्त ६७ धावा काढल्या हाेत्या.

गाेलंदाज प्रमाेद मदुशन, हसरंगा डिसिल्वाने निश्चित केला संघाचा विजय श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजी करताना समाधानकारक माेठी खेळी करता आली नाही. सुमार फलंदाजीमुळे श्रीलंका संघाला माेठा फटका बसला. मात्र, हीच कसर गाेलंदाजांनी भरून काढली. प्रमाेद मदुशन आणि वानिंदु हसरंगा डिसिल्वाने फायनलमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांचे कंबरडे माेडले. यात मदुशनने चार षटकांत ३४ धावा देताना चार बळी घेतले. त्याने सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम (५), फखर झमान (०), अहमद (३१) आणि नसीम खानला (४) बाद केले. तसेच हसरंगाने तीन बळी घेतले. त्याने अर्धशतकवीर रिझवान (५५), आसिफ (९) आणि खुशदिलला (२) बाद केले. त्यामुळे पाकिस्तान संघाचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. श्रीलंका संघाला गाेलंदाजीमुळे विजयाचा पल्ला गाठता आला.

नसीमकडून ३ फलंदाज गाेल्डन डक:
पाकिस्तान संघाच्या फाॅर्मात असलेल्या गाेलंदाज नसीम खानने फायनलमध्ये श्रीलंकेच्या कुशल मेंडिसला शून्यावर बाद केले. यासह त्याने स्पर्धेत तीन फलंदाजांना गाेल्डन डक केले आहे. त्याने भारताच्या लाेकेश राहुल व अफगाणिस्तानच्या नबीला शून्यावर बाद केले.

भारतीय जर्सी; चाहत्याला राेखले भारतीय संघाची निळ्या रंगाची जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या चाहत्याला गेटवर अडवण्यात आले. आयाेजकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...