आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान न्यूझीलंड संघाने सलामीच्या कसाेटीत शेवटच्या चेंडूवर पाहुण्या श्रीलंका संघाला धूळ चारली. न्यूझीलंड संघाने साेमवारी घरच्या मैदानावर २ गड्यांनी विजय संपादन केला. न्यूझीलंडच्या या विजयासह श्रीलंका संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेशाच्या आशेवर पाणी फेरले गेले. विजयाच्या २८५ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाने आठ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयामध्ये विलियम्सन (नाबाद १२१) आणि डॅरिल मिशेलने (८१) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे यजमान संघाला घरच्या मैदानावर राेमहर्षक विजय साजरा करता आला. पहिल्या डावातील शतकवीर मिशेलला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.
शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगली कसाेटी : यजमान न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सलामी कसाेटीचा थरार हा शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगला. एक वेळ ३ बाद २३२ धावांवर असलेल्या न्यूझीलंड संघाची माेठी पडझड झाली. यामुळे निकाल हा शेवटच्या चेंडूवर येऊन ठेपला. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ८ धावा आणि श्रीलंकेला ३ विकेटची गरज हाेती. यादरम्यान हेन्रीची विकेट पडली. विलियम्सनने जायबंदी वेगनरसाेबत गाेलंदाज फर्नांडाेच्या शेवटच्या चेंडूवर धावा काढून विजय साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.