आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sri Lanka, Pakistan Successful Thanks To All rounders And Fast Bowlers, Bowlers Who Bowled 150+ In Pakistan Team

दिव्य मराठी ॲनालिसिस:अष्टपैलू व वेगवान गाेलंदाजांमुळे श्रीलंका, पाक यशस्वी, पाक संघात 150+ च्या वेगाने चेंडू टाकणारे गाेलंदाज

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघ सलग दुसऱ्या वर्षी यूएईमधून रिकाम्या हाताने मायदेशी परतला आहे. गतवर्षी भारतीय संघाला टी-२० विश्वचषकादरम्यान सुमार खेळीचा फटका बसला. टीमला या स्पर्धेची बाद फेरीही गाठता आली नव्हती. यंदाही या ठिकाणी टीम इंडियाला टी-२० फाॅरमॅटच्या आशिया कप स्पर्धेतही निराशेला सामाेरे जावे लागले. टीमचा फायनल गाठण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. मात्र, दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गाेलंदाजांच्या सर्वाेत्तम कामगिरीच्या बळावर श्रीलंका, पाकिस्तान संघ यंदा आशिया कपमध्ये यशस्वी ठरले. याच कामगिरीच्या बळावर श्रीलंका संघाने फायनलमध्ये पाकविरुद्ध राेमहर्षक विजयाची नाेंद केली. आशिया कप विजेत्या श्रीलंका संघाला अष्टपैलू खेळाडूंच्या पथकाने किताबाचा बहुमान मिळवून दिला. संघाकडे सात गाेलंदाजांचे पर्यायही उपलब्ध हाेते. त्यामुळे निर्माण हाेणाऱ्या प्रत्येक अडचणीला चाेख प्रत्युत्तर देणारी यंत्रणाच श्रीलंका संघाने सज्ज ठेवली हाेती.

त्यामुळेच प्रथम फलंदाजीत काहीसा अपयशी ठरलेला श्रीलंका संघ गाेलंदाजीमुळे आशिया कप विजेता ठरला. मदुशन आणि हसरंगाच्या गाेलंदाजीने पाक टीमची दाणादाण उडवून टाकली.

तसेच उपविजेत्या पाकिस्तान संघाला वेगवान गाेलंदाजांचे माेठे पाठबळ लाभले. कारण, टीमच्या गाेलंदाजांनी १५०+ च्या तुफानी वेगाने चेंडू टाकून श्रीलंका संघाच्या फलंदाजांची दमछाक करून टाकली. त्यामुळे श्रीलंका संघाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पाक संघाच्या गाेलंदाजांनी या स्पर्धेत १८० पेक्षा अधिक चेंडू हे १४० किमी/प्रतितासाच्या वेगाने टाकले. त्याचा माेठा फायदा पाक टीमला आता फायनल गाठण्यासाठी झाला.

बातम्या आणखी आहेत...