आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून टी-20 मालिका रंगणार:श्रीलंका संघ 7 वर्षांपासून भारतात टी-20  सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया आपल्या घरच्या मैदानावर टी-२० मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. यजमान भारताला आता ही माेठी संधी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला उद्या मंगळवारपासून सुरुवात हाेत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हे दाेन्ही संघ सलामीच्या सामन्यात समाेरासमाेर असतील. यादरम्यान श्रीलंका संघ गत सात वर्षांपासून भारतामध्ये टी-२० सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, यजमान भारताने आपला दबदबा कायम ठेवताना या फाॅरमॅटमध्ये श्रीलंका टीमला धूळ चारली. श्रीलंका संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये यजमान भारताचा टी-२० सामन्यात पराभव केला हाेता. त्यानंतर टीमला अद्यापही भारत दाैऱ्यावर टी-२० सामना जिंकता आला नाही. यजमान भारताने २०१६ पासून आजपर्यंत झालेल्या दहा टी-२० सामन्यांमध्ये सलग विजय संपादन केले आहेत. भारताने गत वर्षी फेब्रुवारी महिन्यात ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा ३-० ने धुव्वा उडवला हाेता. या दाेन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ टी-२० मालिका झाल्या आहेत. यातील चार मालिका भारतीय संघाने आपल्या नावे केल्या आहेत.

यजमानांकडून नव्या चेहऱ्यांना संधी
यजमान भारतीय संघ आता टी-२० मालिकेदरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. यातून युवा खेळाडूंना या मालिकेतून आपली क्षमता सिद्ध करण्याची माेठी संधी आहे. भारताकडून राहुल त्रिपाठी, शिवम मवी, मुकेशकुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...