आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतचॅम्पियन फ्रान्स व इंग्लंड रंगणार उपांत्यपूर्व सामना:स्टार एमबापेची टाॅप स्पीड ताशी 35 किमी

पॅरिस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतचॅम्पियन फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. जगभरातील फुटबाॅलप्रेमींचे लक्ष या हाय प्राेफाइल सामन्याकडे लागले आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचा पल्ला गाठता येणार आहे. सर्वांची नजर यंदा फाॅर्मात असलेल्या किलियन एमबापेवर असणार आहे. फ्रान्सचा हा खेळाडू सध्या सर्वाेत्तम खेळीमुळे चर्चेत आहे.

1 सर्वात महागडा दुसरा फुटबाॅलपटू : फ्रान्सचा एमबापेने पीएसजीसाेबत २०१७ मध्ये १३२५ काेटींत करार केला हाेता. यासह ताे जगातील दुसरा सर्वात महागडा ट्रान्सफर ठरला. त्याने फ्रेंच चॅम्पियन टीमविरुद्ध २३७ सामन्यांत १९० गाेल केले आहेत.

2 सिरियल विनर: सात वर्षांच्या करिअरमध्ये त्याच्या नावे २०१८म ध्ये वर्ल्डकप, २०२०-२१ मध्ये नेशन्स लीग, पाच लीग-१ टायटल, तीन फ्रेंच कप, दाेन फ्रेंच लीग कप नाेंद आहेत. २०१७ मध्ये गाेल्डन बाॅय, फ्रेंच प्लेअर ऑफ द इयरचा मानकरी ठरला.

3 वर्ल्डकप लक्षवेधी खेळी : गत विश्वचषकात १९ वर्षीय असलेल्या एमबापेने ४ गाेल केले हाेते. फायनलमध्ये क्राेएशियाविरुद्ध गाेल करून फ्रान्सला जेतेपद मिळवून दिले. ताे पेलेनंतर (१९५८) फायनलमध्ये गाेल करणारा दुसरा युवा ठरला.

4 रेकाॅर्डब्रेकर युवा खेळाडू : पॅरिसमध्ये जन्मलेल्या एमबापेने स्थानिक एएस बाँडी टीमकडून खेळण्यास सुरुवात केली. डिसेंबर २०१५ मध्ये माेनाकाेकडून पदार्पण केले. १६ वर्षे ३४७ दिवसांचा असताना क्लबच्या इतिहास सर्वात युवा खेळाडू ठरला. 5 सुपरफास्ट खेळाडू : पाेलंडविरुद्ध प्री-क्वार्टर फायनलदरम्यान फ्रान्सने ३-१ ने विजय साजरा केला. यात एमबापेचे माेलाचे याेगदान ठरले. त्याने ३५.३ किमी/प्रतितासाच्या वेगाने खेळी केली. यंंदा सहा फुटबाॅलपटूंची खेळी सुपरफास्ट ठरत आहे. 6 ग्लोबल स्टार: ऑक्टाेबरमध्ये एमबापेने फाेर्ब्जच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबाॅलपटूंच्या यादीत धडक मारली. त्याने ९ वर्षांत मेसी, राेनाल्डाेेला मागे टाकत हा पल्ला गाठला. त्याची सत्रातील कमाई जवळपास १०५५ काेटींची आहे.

बातम्या आणखी आहेत...