आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Star Team's 'Killer Moroccan', Morocco 1 0 Winner; Reynalda's Portugal Challenge Ends

उपांत्यपूर्व फेरी:स्टार टीमचा ‘किलर माेरोक्कन’, माेराेक्काे 1-0 ने विजयी; राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल संघाचे आव्हान संपुष्टात

दाेहा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युसूफ एन नेसरीने (४२ वा मि.) निर्णायक गाेल करून माेराेक्काे फुटबाॅल संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यासह माेराेक्काे संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. माेराेक्काे संघाने उपांत्यपूर्व फेरीत राेनाल्डाेच्या बलाढ्य पाेर्तुगाल टीमचा पराभव केला. माेराेक्काे संघाने १-० अशा फरकाने एेतिहासिक विजय संपादन केला. यातून या आफ्रिकन फुटबाॅल संघाला पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठता आला. वर्ल्डकपची सेमीफायनल गाठणारा माेराेक्काे हा पहिला आफ्रिकन संघ ठरला. सुमार खेळीमुळे किताबाच्या प्रबळ दावेदार पाेर्तुगाल संघाला स्पर्धेत बाहेर पडावे लागले. या संघाला शेवटच्या मिनिटांपर्यंत गाेल करता आला. अंडर-डॉग मोराेक्काे संघाच्या डिफेन्ससमाेर रोनाल्डो, पेपे, कोस्टा, रामोस, फेलिक्ससारखे स्टार खेळाडू सपशेल फ्लाॅप ठरले. पाेर्तुगाल संघाला वाद आणि खेळाडूंमधील दुफळीचा माेठा फटका बसला. त्यामुळे संघाला विजयाची चव चाखता आली नाही.

बातम्या आणखी आहेत...