आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या सत्रातील डायमंड लीगला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आगामी जुलै महिन्यात अमेरिकेतील युजीनमध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप होणार आहे. त्यामुळे दोहा डायमंड लीगला महत्त्वाचे मानले जाते. या लीगमध्ये आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी जगभरातील सुपरस्टार धावपटू धावणार आहेत. त्यामुळे जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण, हे सिद्ध करण्यासाठी यंदा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन धावपटूंमध्ये चुरस रंगणार आहे. गतवर्षी कोरोना महामारीचा धोका असल्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, यंदा या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी बुडापेस्ट येथे २०२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे तिन्ही स्पर्धांच्या तयारीसाठी धावपटू सक्रिय झाले आहेत. यातून दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी धावपटूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. कारण १०० मीटरमध्ये खास चुरस रंगणार आहे.
पुरुष 100 मीटर: वर्ल्ड चॅम्पियन कोलमॅनची ऑलिम्पिक चॅम्प जॅकब्जवर ०.०४ सेकंदाने आघाडी
जगातील सर्वात वेगवान धावपटू होण्यासाठी कोलमॅन हा आता हाच वर्ल्ड चॅम्पियन धावपटू दोहाच्या ट्रॅकवर मार्सेल जॅकब्जला तगडे आव्हान देणार आहे. इटलीच्या जॅकब्जने ९.८० सेकंदांत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. कोलमॅन आपल्या घरच्या मैदानावर चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक आहे.
महिला 200 मीटर : वर्ल्ड चॅम्पियन स्मिथचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हेराहपेक्षा ०.३५ सेकंद अधिक वेळ नोंद
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत हेराहने २०२० मध्ये १००, २०० मीटरमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तिने टोकियोत २१.५३ सेकंदांत चॅम्पियनचा बहुमान पटकावला होता. तिच्यासमोर वर्ल्ड चॅम्पियन डायना एशर स्मिथचे तगडे आव्हान असणार आहे. स्मिथने २०१९ मध्ये २१.८८ सेकंदांत सुवर्णपदक पटकावले होते.
महिला 800 मीटर : ऑलिम्पिक सुवर्ण व रौप्यपदक विजेती एथिंग व कॅली पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यास उत्सुक
या इव्हेंटमध्ये अमेरिका आणि इंग्लंडच्या धावपटूंमध्ये चुरस रंगणार आहे. त्यामुळे या गटात अमेरिकेची एथिंग व इंग्लंडची कॅली यांची नजर जगातील सर्वात वेगवान लांब पल्ल्याची धावपटू होण्यावर लागली आहे. या दोघींनी अद्याप करिअरमध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले नाही.
पुरुष हाय जम्प : ऑलिम्पिकमध्ये बार्शिम-तांबाेरीने सुवर्णपदक जिंकले, आता इतरांसाठी आव्हानात्मक ठरणार
कतारच्या मुताज एसा बार्शिम व इटलीच्या जियानमार्को तांबाेरी यांच्यात खास मैत्री आहे. दोघांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. त्यांच्या नावे २.३७ मीटरच्या हायजम्पची नोंद आहे. बार्शिमने करिअरमध्ये दोन वेळा जागतिक स्पर्धेत किताब पटकावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.