आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युदो:राज्य ज्युदोत औरंगाबादला 6 पदके

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे येथे झालेल्या पुनीत बालन प्रस्तुत आणि महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या वतीने आयोजित ४९ व्या राज्यस्तरीय बालगट व कॅडेट स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी एकूण ६ पदके आपल्या नावे केली. यात २ रौप्यपदके व ४ कांस्यपदकांचा सामवेश आहे. या स्पर्धेत ५०५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेत बालगटात मुलांमध्ये ४५ किलो गटात ऋषिकेश घुगेने रौप्य व ६६ किलो गटात हर्षवर्धन नागेने कांस्य जिंकले. मुलींमध्ये ४० किलो गटात श्रुतकीर्ती के. हिने कांस्य आणि ४४ किलो गटात रिया पाटीलने रौप्यपदक पटकावले. त्याचबरोबर, कॅडेट गटात मुलींमध्ये ७० किलो गटात सुमेधा पठारे आणि ७० किलो वरील गटात स्वरदा बामनोदकर यांनी कांस्यपदक मिळवले.

बातम्या आणखी आहेत...