आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकात नसलेले स्टार:स्टेफानो तीन देशांसाठी खेळला, विश्वचषकात खेळू शकला नाही

​​​​​​​स्वीडन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वीडनचा ज्लाटन इब्राहिमोविच, नॉर्वेचा एर्लिंग हॉलंड, इजिप्तचा मोहंमद सलाह, इटलीचा जियानलुइगी डोनारुमा हे स्टार खेळाडू कतार फुटबॉल विश्वचषकात दिसणार नाहीत.

{अल्फ्रेडो डी स्टेफानो त्याच्या कारकीर्दीत तीन देशाकडून खेळला, पण विश्वचषकाचा सदस्य होऊ शकला नाही. १९४० मध्ये अर्जेंटिनामध्ये खेळाडूंच्या संपानंतर तो कोलंबियाला गेला. अर्जेंटिनाने १९५० आणि ५४ मध्ये स्पर्धेतून माघार घेतली. कोलंबिया फिफाचा भाग नव्हता. १९५३ मध्ये तो स्पेनला गेला. स्पेन १९५४ आणि ५८ मध्ये पात्र ठरू शकला नाही व ६२ मध्ये स्टेफानो जखमी झाला होता. {लायबेरियाचे जॉर्ज विह ९० च्या दशकात सर्वोत्तम खेळाडू होते. पीएसजी व एसी मिलानकडूनही लीगचे विजेतेपद पटकावले, पण ते देशाला विश्वचषकासाठी पात्रता मिळवून देऊ शकले नाहीत. ते २०१८ पासून लायबेरियाचे राष्ट्रपती आहेत. {जेरी लिटमानेन १९९५ ला अयाक्स व सॅमी हेपियाने २००५ मध्ये लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग जिंकली.

बातम्या आणखी आहेत...