आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडेच राहणार आहे. एकदिवसीय मालिकेतही त्याच्याकडे कर्णधारपद कायम राहणार आहे. कारण रेग्युलर कर्णधार असलेला पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियातच राहणार आहे.
कमिन्सची आई मारिया यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. त्या दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. दुसऱ्या कसोटीपासून कमिन्स मायदेशी परतला होता. त्याने आईची काळजी घेतली. दरम्यान, आईचे निधन झाल्याने कमिन्स मायदेशीच राहणार आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथकडेच वनडे सीरीजचेही कर्णधारपद राहणार आहे.
स्मिथने 37 कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले
स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. 2014 ते 2018 दरम्यान तो ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. पण 2018 मध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे त्याला कर्णधारपद सोडावे लागले होते. यानंतर मधल्या काळात काही वेळा त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली. आतापर्यंत या खेळाडूने 37 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले आहे. येथे त्याने 21 सामन्यांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे, तर 10 सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरित 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.
कसोटीतही स्मिथने ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळली
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 ची शेवटची आणि निर्णायक कसोटी अहमदाबादमध्ये खेळली गेली. मात्र, ऑस्ट्रेलियाचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्स भारतात परतला नव्हता. त्यामुळे कसोटीतही स्मिथने ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळली आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतरच पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला होता. इंदूर कसोटीतही तो उपलब्ध होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.