आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Story Of Tulika Maan, Silver Medalist In Judo: Father Killed When She Was 7, Mother And Coach Are Role Models For Tulika

ज्युदोत रौप्य जिंकणाऱ्या तुलिका मानची कहाणी:ती 7 वर्षांची असताना वडिलांची झाली होती हत्या, आई आणि प्रशिक्षक आहेत आदर्श

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नजफगढ, दिल्ली येथील ज्युदो खेळाडू तुलिका मान हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 78+ KG मध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकले. तुलिका 7 वर्षांची असताना तिच्या वडिलांची हत्या झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसात काम करणाऱ्या तिच्या आईने तिची आणि तिच्या लहान बहिणीची काळजी घेतली.

राष्ट्रकुल स्पर्धेत जाण्यापूर्वी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत तुलिका मान म्हणाली की, 'माझी आई आणि माझ्या प्रशिक्षकाची पत्नी आरती सोलंकी माझ्या आदर्श आहेत.'

ती म्हणाली, '2005 मध्ये वडिलांची हत्या झाल्यानंतर आईने आम्हा दोघी बहिणींचा सांभाळ केला. कर्तव्यासोबतच त्यांनी आम्हा दोन्ही बहिणींनाही मोठ्या प्रेमाने वाढवले.

आई तिझ्या ड्युटीला जाताना मला कोचिंग सेंटरवर सोडायची, आणि मग तिथून घेऊन यायची. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू दिली नाही.

याशिवाय माझे प्रशिक्षक यशपाल सोलंकी यांच्या पत्नी आरती सोलंकी यांच्यामुळेही मी खूप प्रभावित झाले आहे. त्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांना दोन मुले आहेत. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक दरम्यान त्याचे वजन 125 किलो होते, मात्र 6 महिन्यांत त्याचे वजन 60 किलोने कमी झाले.

आई आणि मॅडमला पाहून मला वाटतं की मीही तसे करू शकते आणि देशासाठी पदक जिंकू शकते. मॅडममुळे मी प्रभावित होऊन माझे वजन कमी केले.

जेव्हा लॉकडाऊन दरम्यान कोरोनाच्या काळात ट्रेनिंग होत नव्हती, त्यावेळी माझे वजन खूप वाढले होते. मॅडमच्या प्रेरणेने मी पुष्कळ वजन कमी केले आणि पुन्हा खेळात परतले.

फायनलपूर्वी तुलिकाच्या आईने तिला दिल्या होत्या शुभेच्छा

एकाकीपणापासून वाचण्यासाठी ज्युडोची केली निवड

तुलिकाने एकटेपणापासून वाचण्यासाठी आपल्या करिअरची सुरुवात केली. ती म्हणते, “मी लहान होते आणि माझ्या आईला ड्युटीवर जावे लागायचे. अशा परिस्थितीत मी घरात एकटीच राहायची आणि आई दार बंद करून बाहेर पडायची. मला कंटाळा यायचा. एके दिवशी माझ्या मित्राने मला या खेळात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मी आईला विचारले तर ती हो म्हणाली.

मग टाईमपास करण्यासाठी ज्युदोचे क्लास घेतले. मेडल्स यायला लागल्यावर माझी मॅम संगीता गुप्ता यांनी मला खूप प्रोत्साहन दिले, त्यानंतर माझे मन ज्युदोमध्ये गुंतत गेले आणि मला वाटले की यातच मला करिअर करायचे आहे. त्यानंतर मी यशपाल सरांकडे ट्रेनिंगसाठी जाऊ लागले.

लढण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करणे आणि चॉकलेट खाणे आवडते

तुलिकाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, फाईटपूर्वी तिला थंड पाण्याने आंघोळ करणे आणि चॉकलेट खाणे सर्वात जास्त आवडते. ती थंड पाण्याने आंघोळ करते जेणेकरून तिचे मन थंड राहते आणि ती लढाईवर लक्ष केंद्रित करू शकते. त्याच वेळी, तिला कोको चॉकलेटमधून ऊर्जा मिळते.

लॉकडाऊन दरम्यान केला 3D अ‍ॅनिमेशनचा कोर्स

पूजा अभ्यासातही अव्वल आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात त्याने थ्रीडी अ‍ॅनिमेशनचा कोर्स केला. तिची धाकटी बहीणही अभ्यासात खूप पुढे आहे. तुलिकाने सांगितले की बहिणीला ज्युदो आवडत नाही. तिला दुखापत होणाऱ्या खेळात यावे अशीही माझी इच्छा नव्हती.

बातम्या आणखी आहेत...