आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Strong Indian Hockey Team For Commonwealth Games; Leadership To Manpreet; Opening Match Against Ghana

राष्ट्रकुल स्पर्धा:राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मजबूत भारतीय हॉकी संघ;  मनप्रीतकडे नेतृत्व; घानाविरुद्ध सलामी सामना

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २८ जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धा; भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर

दाेन वेळचा राैप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघ यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत किताब जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. बर्मिंगहॅम येथे पुढच्या महिन्यात २८ जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मनप्रीत सिंगकडे भारतीय हॉकी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्या कुशल नेतृत्वात भारताने टाेकियाे आॅलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. हॉकी इंडियाने सोमवारी भारताचा १८ सदस्यीय संघ जाहीर केला. भारतीय संघाला या स्पर्धेत दमदार विजयी सलामीची संधी आहे. भारताचा स्पर्धेतील पहिला सामना ३१ जुलै राेजी घानाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा मजबूत असा संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघ या स्पर्धेच्या ब गटात सहभागी होणार आहे. भारतासह या गटात यजमान इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना संघांचा समावेश आहे.

भारतीय संघ : गाेलरक्षक : पीआर श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. डिफेंडर : वरुण कुमार, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, जरमनप्रीत सिंग, मिडफील्डर : मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंग, नीलकांत शर्मा, फॉरवर्ड : मनदीप सिंग, गुरजंत सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक.

बातम्या आणखी आहेत...